आरोग्यकुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

▪️जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू विना मास्क फिरल्यास आता ५०० रुपये दंड – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

✍🏻 प्रतिनिधी :सुनिल आचरेकर

🎴सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी जिल्‍हयात रात्री 11.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्‍यावश्‍यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्‍तव रुग्‍ण व त्‍यासोबत असलेले नातेवाईक यांना सूट देण्यात आली आहे. सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तींच्‍या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल. जिल्ह्यातील सर्व सार्जवनिक ठिकाणी, आस्‍थापना, समारंभ, कार्यक्रमाचे ठिकाणी मास्‍क वापरणे बंधनकारक असेल. मास्‍क, रुमाल न वापरल्‍यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्‍यक्‍तींकडून 1 हजार रुपये दंडाची रक्‍कम महसूल, पोलीस व स्‍थानिक प्राधिकरण वसूल करतील. मास्‍क जवळ बाळगून त्‍याचा वापर न करणे, किंवा योग्‍य रितीने वापर न करणे या बाबी सुध्‍दा मास्‍कचा वापर न करणे, याप्रमाणे समजण्‍यात येऊन दंड आकारण्यात येईल. लग्‍न समारंभ फक्त 50 व्‍यक्‍तीच्‍या उपस्थितीत पार पाडता येईल. त्यासाठी संबंधित तहसिलदारांची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. सांस्‍कृतिक कार्यक्रम, क्रीडास्‍पर्धा, यात्रा, जत्रा, उरुस इत्‍यादीचे फक्त धार्मिक विधी फक्त 50 व्‍यक्‍तींच्‍या मर्यादेत करता येतील. त्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. जिल्‍हयातील आठवडी बाजार हे स्‍थानिक प्राधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय भरवता येणार नाहीत. पर्यटन स्‍थळे, आठवडा बाजाराची ठिकाणे, सर्व सार्वजनिक, धार्मिक स्‍थळे, उद्याने, मोकळया जागा, मनोरंजन पार्क, क्रीडांगणे, समुद्र किनारे इत्‍यादी ठिकाणी एकाचवेळी 50 पेक्षा जास्‍त लोकांना एकत्र येण्‍यास मज्‍जाव करण्‍यात आला आहे.
कोव्‍हीड 19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महसूल, पोलीस व संबंधित स्‍थानिक प्राधिकरण यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. सदर पथके सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमांचे ठिकाणी भेटी देवून कोव्‍हीड -19 बाबत तरतूदींचा भंग होत असल्‍यास दंडात्मक कारवाई करतील. अतिथी, ग्राहकांनी वापरलेली फेस कव्‍हर, मास्‍क, हातमोजे यांची संबंधितांनी योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!