कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत रविवारी ‘धर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज…’ शिव व्याख्यान.

*🛑सावंतवाडीत रविवारी ‘धर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज…’ शिव व्याख्यान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ९ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील ऐतिहासिक राजवाड्यात भव्य शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘धर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज…’ या विषयावर प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षक म्हणून केलेल्या महान कार्यातील अजरामर पराक्रम व रोमांचकारी शौर्यगाथा प्रभावी शब्दांत मांडणार आहेत.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वात शौर्य, धैर्य, आदर्श आणि तेज असे अनेक पैलू आहेत. मात्र या सर्वांमध्ये धर्मरक्षक म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका विशेषत्वाने उजळून दिसते. शिवशाहीच्या आधी मुघल, आदिलशाही तसेच पोर्तुगीजांच्या आक्रमणांमुळे केवळ धर्मच नव्हे तर येथील संस्कृतीही धोक्यात आली होती. मंदिरांवरील आघात, जनतेवरील अत्याचार यामुळे समाज हैराण झाला होता. अशा परिस्थितीत सह्याद्रीतून उभ्या राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झंजावाताने या अत्याचारी प्रवृत्तींना सडेतोड प्रत्युत्तर दिले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

महाराजांनी केवळ हिंदू धर्म व संस्कृतीचे रक्षण केले नाही, तर सर्व धर्मांप्रती आदर ठेवण्याचा आदर्शही जगासमोर ठेवला.

या धर्मरक्षक शौर्यगाथेचा सखोल इतिहास सर्व स्वाभिमानी राष्ट्रभक्तांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, डॉ. प्रविणकुमार ठाकरे व केदार बांदेकर यांनी सर्व शिवप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वीच्या शिवजागरांत रयतेचे राजे शिवराय आमुचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, महाराजांची आग्र्याहून सुटका, नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगडाचा रणसंग्राम, छत्रपतींचा दक्षिण दिग्विजय आणि रणझुंजार ताराराणी साहेब अशी आठ ऐतिहासिक पुष्पे सादर करण्यात आली असून त्यांना आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे हे ९ वे पुष्प देखील ऐतिहासिक राजवाड्यात शिवप्रेमींच्या गर्दीने बहरणार आहे.

डॉ. शिवरत्न शेटे यांचा परिचय :

डॉ. शिवरत्न शेटे हे हिंदवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून महाविद्यालयीन जीवनापासून शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून व्याख्याने देत आहेत. ओघवत्या वाणीमुळे त्यांच्या व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभी राहते. समकालीन बखरी, इतिहासाचार्यांचे लेखन तसेच महाराजांनी केलेल्या मोहिमांचे प्रत्यक्ष स्थळभेटींद्वारे त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी पन्हाळा–पावनखिंड पदयात्रा तसेच विविध गडकिल्ल्यांवर मोहिमा आयोजित केल्या जातात. शिवाय शेतकरी आत्महत्या प्रबळ भागांत शिवचरित्राच्या माध्यमातून जगण्याची उमेद देणारे प्रेरणादायी व्याख्यान कार्यही ते करतात.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!