कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव–ब्राम्हणपाट परिसरातील वायंगणी भातशेतीचे गवारेड्यांकडून नुकसान.

*🛑मळगाव–ब्राम्हणपाट परिसरातील वायंगणी भातशेतीचे गवारेड्यांकडून नुकसान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* मळगाव–ब्राम्हणपाट येथील शेतकरी मिलिंद पंतवालावलकर यांच्या वायंगणी भातशेतीचे गवारेड्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. नुकतीच जोमात वाढलेली शेती गवारेड्यांच्या कळपांनी फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने या उपद्रवावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंतवालावलकर यांनी केली आहे.

मळगाव–ब्राम्हणपाट परिसरात शेतकरी वायंगणी भातशेतीसह वाल, चवळी, भुईमूग, मका, मुळा, लाल माठ, मिरची आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र या भागात गवारेड्यांचा उपद्रव वाढला असून, कळपाने येणारे गवारेडे शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. गवा रेड्यांच्या उपद्रवाचे हे चक्र तिन्ही ऋतूंमध्ये सुरूच असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास गवारेड्यांकडून हिसकावून घेतला जात असल्याने शेती करावी की नको, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे पावसाळी भातशेतीचे नुकसान झाले असताना, दुसरीकडे काबाडकष्टाने लागवड केलेली वायंगणी भातशेती गवारेडे उद्ध्वस्त करीत आहेत. एवढे परिश्रम करूनही रानटी प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने शेवटी शेतकऱ्यांच्या नशिबी रडणेच येते, अशी खंत पंतवालावलकर यांनी व्यक्त केली. या गंभीर समस्येचा शासनस्तरावर विचार व्हावा, तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या संघटनांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!