कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेताळ प्रतिष्ठानच्या ‘दौड’ स्पर्धेत धावपटूंचा झंझावात; ‘गुरे ढोरे जपूया, निरोगी आयुष्य जगूया’ संदेशाला मोठा प्रतिसाद.

*🛑वेताळ प्रतिष्ठानच्या ‘दौड’ स्पर्धेत धावपटूंचा झंझावात; ‘गुरे ढोरे जपूया, निरोगी आयुष्य जगूया’ संदेशाला मोठा प्रतिसाद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴 वेंगुर्ले, दि- ०६:-* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरे ढोरे जपूया, निरोगी आयुष्य जगूया’ या वैशिष्ट्यपूर्ण दौड स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद लाभला. एकूण १२ गटांत पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन तुळस येथील प्रसिद्ध उद्योजक स्वप्नील झांट्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्साहात करण्यात आले. ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये विजयानंद सावंत, तुळसचे उपसरपंच सचिन नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव डॉ. सचिन परुळकर, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. दिलीप शितोळे, डॉ. जी. पी. धुरी, तेजस बादिवडेकर, तळवडे येथील शिक्षक बांगर सर, मंगेश राऊळ, उत्कर्ष कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अरुण सावंत आणि ‘जागृती’चे दिलीप मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. स्वप्नील झांट्ये यांनी शारिरीक फिटनेस चे महत्व विशद करत प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:

या चुरशीच्या स्पर्धेत १ ली ते २ री मुलांच्या गटात विनायक विठ्ठल खरात (आवेरे) याने प्रथम, तत्पर तेजस बादिवडेकर (होडावडे) याने द्वितीय तर पृथ्वीक रामचंद्र नाईक (वेंगुर्ला) याने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या याच गटात रोशनी उमेश सावंत (तुळस) प्रथम, जिया सतीश राणे (वजराठ) द्वितीय आणि पुनर्वी ललित दळवी (वेंगुर्ला) तृतीय आली. ३ री ते ४ थी मुलांच्या गटात प्रिन्स प्रमेश पासवान याने प्रथम, अस्मित अभिजीत गिरप याने द्वितीय तर मंजुनाथ उमेश दोडमणी याने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींमध्ये हर्षिका गणपत सकपाळ (मठ) प्रथम, स्वरा संदीप पेडणेकर (वेंगुर्ला) द्वितीय आणि पृथा संदीप परब (वेंगुर्ला) तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.

५ वी ते ६ वी मुलांच्या गटात मॅनविल मनवेल शिवलकर (वेंगुर्ला), एकांश बुद्याजी तुळसकर (तुळस) आणि मदन कृष्णा परब (तुळस) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. मुलींच्या गटात गार्गी संदीप परब (परबवाडा) प्रथम, दिया दिलीप मालवणकर (वेंगुर्ला) द्वितीय तर प्रिया संतोष गोवेकर (आवेरे) तृतीय आली. ७ वी ते ८ वी मुलांच्या गटात गुरुनाथ रमाकांत मांजरेकर (तळवडे) याने प्रथम, भावेश संतोष यादव (ओरस) याने द्वितीय आणि सुशोबन सावंत (सावंतवाडी) याने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात साक्षी सुधीर पांगम (तुळस) प्रथम, आस्था अमित लिंगवत (सावंतवाडी) द्वितीय आणि महिमा विशाल मोहिते (मालवण) तृतीय आली.

९ वी ते १० वी मुलांच्या गटात वजराठ येथील चैतन्य महेश राणे, चिन्मय महेश राणे आणि अथर्व संतोष राणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर यश संपादन केले. मुलींच्या गटात साक्षी संदीप पेडणेकर (उभादांडा) प्रथम, श्रावणी यशवंत दळवी (तळवडे) द्वितीय आणि आलिशा सुरेश कुबल (उभादांडा) तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.

खुला गट:

खुल्या पुरुष गटात कुडाळच्या आदित्य आनंद राऊळ याने निर्विवाद वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक पटकावला, तर मणेरीच्या नाउ संतोष फाले याने द्वितीय आणि ओरसच्या दीपक मुकुंद फाले याने तृतीय क्रमांक मिळवला. महिलांच्या खुल्या गटात मालवणची रेश्मा रावबा पांढरे हिने प्रथम, आवेरेची भूमिका विलास सावंत हिने द्वितीय आणि तुळसची गौरी सचिन धरणे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वेताळ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व विजेत्यांना प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘अश्वमेध महोत्सव’ मध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!