येत्या मंगळवारपासुन कणकवली शहरात आठवडा बाजार भरणार नाही – समीर नलावडे

 

 

गेले चार दिवस सातत्याने नगरपंचायतकडुन विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई

येत्या मंगळवारपासुन कणकवली शहरात आठवडा बाजार भरणार नाही

Kokan Live Breaking News

 

प्रतिनिधी : रविकांत जाधव

*कणकवली : दि. २४* ​कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागल्याने, यापुढे कणकवली शहरात कोरोना संदर्भातल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपंचायतला सहकार्यची भुमिका घेत; सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क लावणे, हात धुणे. आदि कोरोना संदर्भात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांकडुन नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात ​२०० ऐवजी ​५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 

गेले चार दिवस सातत्याने नगरपंचायतकडुन विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतुन दंड वसुल झाला. मात्र दंड वसूल करणे हे नगरपंचायतचे उद्दिष्ट नसुन, लोकांनी मास्कचा वापर करावा. याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, असेही नलावडे यांनी सांगितले.

 

तसेच मंगळवारचा आठवडा बाजार बंद असला तरीही, दर मंगळवारी कणकवली शहरात बाजारासाठी होणारी गर्दी विचारात घेता. येत्या मंगळवारपासुन कणकवली शहरात आठवडा बाजारासाठी जिल्हा व तालुक्या बाहेरून येणाऱ्या भाजी, फळ, फुल व अन्य विक्रेत्यांना शहरात दुकाने लावण्या मनाई करण्यात आली आहे. याबाबत संबंधित तालुक्या, जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या दुकानदारांना, विक्रेत्यांना सुचना देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली.

 

आठवडा बाजार सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत, जिल्हा व तालुक्यात बाहेरील विक्रेत्यांना शहरात मंगळवारची दुकाने लावण्यास सक्त मनाई असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नगरपंचायतला सहकार्य करावे. तसेच कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!