विनापरवाना व ओव्हरलोड सिलिका वाळु वाहतुक प्रकरणी दोन डंपर आणि दोन सिलिका वाळुचे ट्रक ताब्यात*
*▪️सोमवारी सायंकाळी उशिरा कासार्डे येथे कारवाई, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केली*
*🖥️Kokan Live Breaking News*
*✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव*
*🎴कणकवली : दि. २३* विनापरवाना व ओव्हरलोड सिलिका वाळु वाहतुक प्रकरणी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केलेल्या कारवाईत दोन डंपर आणि दोन सिलिका वाळुचे ट्रक ताब्यात घेण्यात आले. सोमवारी सायंकाळी उशिरा कासार्डे येथे ही कारवाई करण्यात आली.
कारवाईनंतर चारही वाहने पंचनामे करून कणकवली तहसील कार्यालयासमोर आणण्यात आली होती. विनापरवाना वाळु उपसा आणि वाहतुक प्रकरणी दस्तुरखुद्द प्रांताधिकारी मैदानात उतरल्याने सिलिका वाळु व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
सोमवारी सायंकाळी महसुलच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईत प्रांताधिकारी वैशाली राजमाने, महसुल नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड, मंडळ अधिकारी मंगेश यादव, संतोष नागावकर, नांदगाव मंडळ अधिकारी व्ही. ए. जाधव, नांदगाव, तळेरे, फोंडाघाट, लोरे तलाठी, कोतवाल या कारवाईत सहभागी झाले होते.
गेले काही दिवस कणकवली तालुक्यात कासार्डे भागात अनधिकृत सिलिका वाळु उपसा होत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर सिलिका वाळु वॉशिंग प्रश्नी तालुक्यातील काही सरपंचांनी उपोषणही छेडले होते. या पार्श्वभुमीवर प्रांताधिकार्यांनी ही धडक कारवाई केल्याने, सिलिका वाळु व्यावसायिकांचे धाबे दणाणले असुन येत्या काळात महसुल विभागाकडुन ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याची माहिती महसुलच्या सुत्रांनी दिली.