कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा बळी : १९ वर्षीय कस्तुरी पाताडेंना श्रद्धांजली व आरोग्य व्यवस्थेच्या अनागोंदीविरोधात कुडाळमध्ये सजग नागरिकांची बैठक.

*🛑डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा बळी : १९ वर्षीय कस्तुरी पाताडेंना श्रद्धांजली व आरोग्य व्यवस्थेच्या अनागोंदीविरोधात कुडाळमध्ये सजग नागरिकांची बैठक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- १९:-* कासार्डे येथील १९ वर्षीय युवती कु. कस्तुरी पाताडे हिचा कणकवली येथील नागवेकर हॉस्पिटलमध्ये कथित चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मृत युवतीच्या नातेवाईकांना डॉक्टर व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांकडून मिळालेली उद्धट, असंवेदनशील वागणूक, त्यानंतर उसळलेला जनआक्रोश आणि हॉस्पिटलमध्ये झालेली तोडफोड, तसेच त्यावर प्रतिक्रिया म्हणून जिल्हाभरातील खाजगी डॉक्टरांनी बंद ठेवलेल्या OPD, या साऱ्या घटनांनी आरोग्य व्यवस्थेतील गंभीर प्रश्न ऐरणीवर आणले आहेत.

या पार्श्वभूमीवर कु. कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी कुडाळ शहरातील जागरूक व सजग नागरिकांच्या वतीने रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथील श्री गणपती मंदिर, कोर्टाच्या बाजूला एक महत्त्वाची नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत केवळ

श्रद्धांजलीपुरते मर्यादित न राहता,रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी वैद्यकीय पद्धती

खाजगी हॉस्पिटल्समधील मनमानी

*रुग्ण व नातेवाईकांशी होणारे अमानवी वर्तन*

जबाबदारी टाळणारी आरोग्य यंत्रणा

आणि अशा घटनांनंतर सामान्य जनतेलाच आरोपी ठरवण्याची प्रवृत्ती.

या सर्व संवेदनशील व ज्वलंत मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय केला जाणार आहे.

आज कस्तुरी, उद्या कुणीही असू शकते” — हा इशारा देत आयोजकांनी नागरिकांना भावनिक नव्हे तर संवेदनशील, सजग आणि एकसंधपणे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य सेवा ही व्यवसाय नसून माणुसकीची जबाबदारी आहे, हे ठासून सांगण्यासाठी जनतेची एकी दाखवणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

या बैठकीस कुडाळ शहरातील तसेच तालुक्यातील जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ शहरातील जागृक सजग नागरिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!