कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑विज्ञानप्रतिभेला सुवर्णमुकुट : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कु.पर्णिका हनुमंत नाईक हिचा प्रथम क्रमांक.

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत.*

*🎴सावंतवाडी, दि१९- :-*
सावंतवाडी — विज्ञान, सर्जनशीलता आणि आत्मनिर्भर भारताची स्वप्ने साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा भव्य आविष्कार म्हणजे ३३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५–२६. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिलाग्रीस स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे दि. १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी हे प्रदर्शन उत्साहात पार पडले.विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी STEM” या कालसुसंगत विषयावर आयोजित या प्रदर्शनात जिल्ह्यातील शाळांमधून विज्ञानविषयक कल्पनांची रेलचेल पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला व्यासपीठ देणाऱ्या या प्रदर्शनात मूळ देवसू, सावंतवाडी येथील आणि आता कुडाळ येथे वास्तव्यास असलेली कुडाळ हायस्कूल, कुडाळ प्रशालेची विद्यार्थिनी कु. पर्णिका हनुमंत नाईक हिने आपल्या प्रभावी मांडणी व आशयघन लेखनाच्या बळावर माध्यमिक गट – निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण विभागातर्फे प्रशस्तिपत्र, आकर्षक स्मृतिचिन्ह व पदक प्रदान करून गौरव करण्यात आला. परीक्षकांनी तिच्या विचारांची स्पष्टता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विषयाशी असलेली समर्पक सांगड यांचे विशेष कौतुक केले.
या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळा प्रशासनाचे प्रोत्साहन,तसेच तिचे वडिल श्री.हनुमंत ऊर्फ सागर नाईक सर जे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा‘ अभियानातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त शिवाजी विद्यालय, हिर्लोक,ता.कुडाळ या हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत त्यांचे तीला विशेष मार्गदर्शन आणि विद्यार्थिनीची सातत्यपूर्ण मेहनत कारणीभूत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कु. पार्णिकाच्या या उज्ज्वल यशामुळे कुडाळ हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, शाळा परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विज्ञानातून स्वप्नांना दिशा आणि प्रतिभेला पंख देणारे हे प्रदर्शन अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

*कसे वापरावे ?*

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

*संपर्कासाठी*
*9423254613*

*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*

—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!