🛑ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या ऑफलाईन नोंदीसाठी समिती.
*🛑ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या ऑफलाईन नोंदीसाठी समिती.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १७:-* हिवाळी अधिवेशनात झालेल्या चर्चेवेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विहित मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेण्यासाठी समिती गठित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विहित मुदतीत ई-पीक पाहणे नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय झाला असून या समितीमध्ये सदस्य म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी हे असणार आहेत.
राज्यात खरीप हंगाम २०२५ हा १ ऑगस्ट, २०२५ पासून सुरु झाला होता. त्यांतर्गत १ ऑगस्ट २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच १ ऑक्टोबर, २०२५ पासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात आली होती. मात्र, बऱ्याच जिल्ह्यात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज आदी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये याकरिता सहायक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला ३० नोव्हेंबर २०२५ अखरेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सन २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात या विषयाबाबत विधानसभा लक्षवेधी सूचना उपस्थित झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनीही लक्ष वेधले होते. तसेच सिंधुदुर्गमध्ये यामुळे भात खरेदी व फळपीक विमा योजनेसंदर्भात निर्माण झालेल्या अडचणींबाबत कृषी आयुक्तांनाही पत्र दिलेले होते.
या समितीने ज्या शेतकऱ्यांना काही कारणांमुळे पिकांची नोंद करता आली नाही, व सदर नोंद ७/१२ उताऱ्यावर आली नाही, त्याबाबत प्रत्यक्षात पीक असल्याची फेरचौकशी करून १५ जानेवारी, २०२६ पर्यंत अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा. समितीने करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरून २ दिवसात निर्गमित करण्याची कार्यवाही करावयाची आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत दररोज आढावा घ्यावा आणि सदर अहवाल महसूल विभागास तसेच पणन विभागास सादर करावा. सदर अहवालानुसार पणन विभागाने पीक खरेदी करण्याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही करावी. सदर समितीच्या फेरचौकशीमध्ये होणाऱ्या पीक नोंदीच्या अनुषंगाने शेतातील शेतमाल खरेदी केंद्रावर खरेदी करण्याच्या अनुषंगाने पणन विभागाने आवश्यक त्या पुढील सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करावी असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

