कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑जयंत बरेगार यांचे उपोषण स्थगित.

*🛑जयंत बरेगार यांचे उपोषण स्थगित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी कागदपत्रे पूर्तता करण्यास १५ दिवस वाढीव मुदत मागून घेत उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता जयंत बरेगार यांनी आपले उपोषण १५ दिवसांसाठी स्थगित केले आहे.

बरेगार यांनी २५ एप्रिल रोजी उपवनसंरक्षक सावंतवाडी वनविभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.त्यात त्यांनी वनविभागाच्या अधिनस्त माणगाव येथील इमारतीला पुरविलेल्या वीज जोडणीबाबत २७ जुलै १९८१ रोजी सुरक्षा ठेव १८१८५ विद्युत मंडळाकडे भरणा केली आहे. या कॅशबुकची प्रत वनक्षेत्रपाल कुडाळ व सावंतवाडी यांच्या कार्यालयाकडे मागणी केली असता वनक्षेत्रपाल सावंतवाडी यांनी हे कॅशबुक आढळत नाही, असे उत्तर दिले होते. ते कायमस्वरूपी जतन करण्याचे कागदपत्र असल्याने ते जतन करणे हे त्यांच्या कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांचे शासकीय कर्तव्य होते. हे कागदपत्रं गहाळ होणे हा महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड अॅक्ट २०५५ चा भंग होत असल्याने सदर कागदपत्रे गायब झाल्याबाबतची जबाबदारी निश्चित करून ती कागदपत्रे परत मिळवण्याकरिता महाराष्ट्र रेकॉर्ड अॅक्ट २००५ चा आधार घेऊन संबंधितांवर पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत तक्रार द्यावी,अशी मागणी केली होती. अशी कारवाई न झाल्यास १५ दिवस वाट पाहून आपण मला पोलीस स्थानकात तक्रार करणे परवानगी दिलीत असे गृहीत धरून मी तक्रार दाखल करेन, असे कळविले होते.

परंतु आज सुमारे आठ महिने झाले तरीसुद्धा कॅशबुक उपलब्ध केले नाही अथवा पोलिसात तक्रारदेखील दिली नाही.सदर बाबीने व्यथित होऊन बरेगार यांनी ५ डिसेंबर रोजी उपवनसंरक्षक सावंतवाडी वनविभाग यांचे कार्यालयात नोटीस देऊन सदरचे कॅशबुक दहा दिवसात उपलब्ध करून न दिल्याने १५ डिसेंबरपासून वन कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.त्याची दखल घेत वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी पंधरा दिवसांची वाढीव मुदत मागून घेत उपोषण स्थगित करण्याची विनंती बरेगार यांना केली होती.त्यानुसार बरेगार यांनी पंधरा दिवसांसाठी उपोषण स्थगित करत असल्याचे म्हटले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!