🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंकडून ‘आदिशक्ती अभियाना’चा आढावा.
*🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंकडून ‘आदिशक्ती अभियाना’चा आढावा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १७:-* जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ‘आदिशक्ती अभियाना’त उत्साहाने सहभागी व्हावे. ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वगुणांकनाची तालुकास्तरीय आदिशक्ती समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून, तालुक्यात उत्कृष्टपणे अभियान राबविणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच संबंधित ग्रामपंचायतींना भेटी देऊन त्यांनी केलेल्या कामाचे भौतिक निरीक्षण करण्यावर विशेष भर देण्याचेही सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक १५ डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर समित्यांनी आदिशक्ती पुरस्कारासाठी केलेल्या स्वगुणांकनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महिलास्नेही वातावरण निर्मिती प्रशिक्षण,सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन आदी निकषांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय आदिशक्ती पुरस्कार मिळवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग हा जिल्हा महिला सुरक्षा,महिला हक्क आणि महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर असल्याचे नमूद करत बालविवाह,हुंडा प्रथा व कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या अनिष्ट प्रथांचे प्रमाण जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आदिशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्याची क्षमता असून,सर्व गावांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केले.
विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक या बैठकीस जिल्हा ग्रामीण उदय पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व.बा.वि.) मनोज पाटणकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

