🛑पोंभुर्ले परिसरात वानरांचा उच्छाद.
*🛑पोंभुर्ले परिसरात वानरांचा उच्छाद.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०९:-* देवगड तालुक्यातील पोंभुर्ले आणि आसपासच्या कोर्ले,धालवली व मालपे या नदी किनारील गावांमध्ये वानर (माकड) यांच्या वाढत्या उपद्रवांमुळे शेतकरी पुरते त्रस्त झाले आहेत.हापूस आंबा,काजू नारळ,सुपारी आणि विविध उन्हाळी पावसाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून या उपद्रवामुळे हजारो एकर जमीन ओसाड पडू लागली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. वन विभागाने या माकडांचा व वानरांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नदी किनारी भागातील शेतकरी मोठ्या कष्टाने उन्हाळी आणि पावसाळी शेती करतात.मात्र, सध्या वानर-माकडांनी पिके खाणे आणि नष्ट करणे सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या हाती कोणतेच पीक लागत नाही. परिणामी, शेती करणेच अशक्य झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांबरोबरच या माकडांकडून घरांच्या छपरावरील कौलांचेही मोठे नुकसान केले जात असल्याने रहिवाशांना सातत्याने या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
शेतकऱ्यांनी या वानर-माकडांना पळवून लावण्यासाठी फटाके, वाद्यांचे आवाज, पाळीव कुत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक स्पीकरसारख्या विविध साधनांचा वापर केला. मात्र, यापैकी कोणत्याही उपायांना ही माकडे घाबरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शेतकरी निराश झाले असून त्यांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची आणि या वानर-माकडांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

