कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑देऊळवाडा महापुरुष मंदिर वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबरपासून.

*🛑देऊळवाडा महापुरुष मंदिर वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबरपासून.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०९:-* देऊळवाडा येथील श्री महापुरुष मंदिराचा १० वा वर्धापन दिन सोहळा ११ ते १४ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

गुरुवार, ११ डिसेंबरला सकाळी ९ वाजता देवाचे मानपान गणेश पूजन, १०.३० वाजता स्थळशुद्धी व कलशशुद्धी, दुपारी १२ वाजता देवस्थापना अग्नी स्थापना, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता दिबदिवी प्रासादिक भजन मंडळ (बुवा प्रणव घाडी) यांचे भजन, रात्री ८ वाजता रामकृष्ण हरि महिला भजन सेवा संघ तेंडोली (बुवा-जुई राऊळ) यांचे भजन, ९ वाजता स्थानिक महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हिरकणी हृदयस्पर्शी एकांकिका, १० वाजता धमाल विनोदी मालवणी एकांकिका ‘आपला ता बायो आणि दुसऱ्याचा ता कारटा’ सादर होणार आहे.

शुक्रवार, १२ रोजी सकाळी ९.३० वाजता कलशरोहण, ११ वाजता होमहवन, दुपारी १२ वाजता कलश पूजन, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वा. नादब्रघ्म भजन मंडळ, कसाल (बुवा-सुंदर मेखी) यांचे भजन, रात्री ९ वा. दत्तमाऊली दशावतार सिंधुदुर्गचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘स्वामी अन्नपूर्णा’ होणार आहे.

शनिवार, १३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबीर, सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, रात्री ८ वा. रवळनाथ भजन मंडळ, पिंगुळी (बुवा-रुपेश मयेकर) यांचे भजन, १० वा. जय हनुमान दशावतार मंडळाचा ट्रिकसीनयुक्त नाटक ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ होणार आहे.

रविवार,१४ रोजी दुपारी १ ते ३ वाजता ब्राह्मण भोजन, सायंकाळी ७.३० वाजता श्री महापुरुष भजन मंडळ, माड्याचीवाडी कुडाळ (बुवा-ऋषिकेश गावडे) यांचे भजन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!