🛑राधारंग फाऊंडेशनची आरआरएफ हाफ मॅरेथॉन १ फेब्रुवारीला.
*🛑राधारंग फाऊंडेशनची आरआरएफ हाफ मॅरेथॉन १ फेब्रुवारीला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴परुळे, दि- ०९:-* सिंधुदुर्ग जिल्हयात विविध सामाजिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या राधारंग फाऊंडेशनच्यावतीने यावर्षीही आर. आर. एफ हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. १ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजता परुळे हायस्कूल येथून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून ५ किमी, १० किमी आणि २१ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा तीन अंतरांच्या शर्यतीत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुष खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत नावनोंदणी करून सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना टी-शर्ट देण्यात येणार आहे. तसेच ठरलेले अंतर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या धावपटूंना पदके (मेडल्स) देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहेत. ५ किमी साठी २०० रु., १० किमी साठी ४०० रु., तर २१ किमी साठी ५०० रु., एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी ऑनलाईन लिंकद्वारे नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
२० जानेवारी २०२६ पूर्वी प्रवेश शुल्क भरून नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच स्पर्धेत सहभागाची संधी देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गोपाळ राऊळ मोबा-८०१०४६८५६५ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

