🛑महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ (अश्वमेध) बॅडमिंटन स्पर्धेसाठी सबा शेखची निवड.
*🛑महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ (अश्वमेध) बॅडमिंटन स्पर्धेसाठी सबा शेखची निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि- ०४:-* बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथील बॅडमिंटन खेळाडू कु.सबा अब्दुलकरीम शेख (द्वितीय वर्ष – विज्ञान) हिची महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ (अश्वमेध) बॅडमिंटन स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणार आहे.
यापूर्वी सबाने कोकण झोन – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड बॅडमिंटन संघाचे नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, मुंबई विद्यापीठाचे ब्राँझ मेडल पटकावून आपली क्षमता सिद्ध केली आहे. तिच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट खेळामुळेच तिला अश्वमेधसारख्या प्रतिष्ठित राज्यस्तरीय विद्यापीठीन स्पर्धेसाठी निवड मिळाली आहे.
सबा शेखने नियमित सराव, शिस्तबद्ध मेहनत आणि तांत्रिक तयारीच्या जोरावर आपली क्रीडा ओळख अधिक भक्कम केली आहे. महाविद्यालयातील जिमखाना विभागाच्या मार्गदर्शनाखाली तिने आवश्यक तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली असून, ती दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहे. अश्वमेधमधील कामगिरीच्या आधारे तिला पुढील ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत संधी मिळू शकते, असे क्रीडा विभागातून सांगण्यात आले. तिच्या यशामुळे महाविद्यालयातील क्रीडापटूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मुलींच्या क्रीडा सहभागासाठीही हे यश प्रेरणादायी ठरत आहे.
सबाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन मंजिरी मोरे-देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी, क्रीडा संचालक प्रा. जे. वाय. नाईक, जिमखाना चेअरमन डॉ. के. आर. कांबळे, संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण, प्रा. संजय चमणकर, प्रा. सुदाम माने यांसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सबाच्या या यशाने महाविद्यालय व वेंगुर्ला तालुक्याचा क्रीडा क्षेत्रातील गौरव अधिक वाढला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

