कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नारायण राणेंची प्रतिमा कोणी खराब केली?” — नितेश राणेंचा केसरकरांना थेट सवाल.

*🛑नारायण राणेंची प्रतिमा कोणी खराब केली?” — नितेश राणेंचा केसरकरांना थेट सवाल.*

 

*🛑आमदार निलेश राणे ‘बळीचा बकरा’; उदय सामंत आणि शिवसेना नेत्यांना टोला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* जिल्ह्याच्या तापलेल्या राजकारणात आज पालकमंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा सडेतोड हल्ला चढवला. “२०१४ ला नारायण राणेंची प्रतिमा खराब करण्याची सुरूवात कुणी केली? निलेश राणेंच्या विरोधात शड्डू कुणी ठोकला? आज तेच लोक ‘कट रचला जातो’ म्हणतायत… हे हास्यास्पद आहे!” — असा थेट प्रहार त्यांनी खासदार दीपक केसरकरांवर केला.पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, निलेश राणेंना मुद्दाम बळीचा बकरा केलं जात आहे, पण या प्रकरणात शिवसेनेचे कोणतेही मोठे नेते पुढे येताना दिसत नाहीत. “उदय सामंत का बोलत नाहीत? एकही शिवसेना नेता समोर येत नाही… एवढं मौन कशासाठी?” असा सवालही त्यांनी उभा केला.

*भाजप विकासाच्या अजेंड्यावर – राणेंची रणनिती स्पष्ट*

नगरपरिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना नितेश राणे यांनी स्पष्ट केलं की भाजप ही निवडणूक “विकासाच्या मुद्यावरच” लढवत आहे.सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ बनवण्याचा संकल्प युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “मुख्यमंत्री फडणवीस, खासदार नारायण राणे आणि मी स्वतः— सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे आहोत,” असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.

*“राजघराण्याला पाठिंबा नाही असं केसरकरांनी स्पष्ट सांगावं”*

आपल्या प्रकृतीची आडोशी घेऊन भावनिक वातावरण तयार करणं योग्य नाही, असे नितेश राणेंनी केसरकरांना टोचून सांगितले.“राजघराण्याच्या आशीर्वादानेच पुढचा प्रवास करायचा आहे. त्यांना पाठिंबा नाही असं केसरकरांनी स्पष्ट सांगावं. आम्हाला कुणालाही दुखवायचं नाही—पण गैरसमज पसरणार नाही याची जबाबदारी त्यांचीही आहे.”

*“भाजपनेच राणेंना उंची दिली… मग आमच्यावर आरोप कसे?”*

२०१४ मधील राजकीय वाद पुन्हा एकदा चोखाळत नितेश राणेंनी आठवण करून दिली की,

“नारायण राणेंना केंद्रीय मंत्री करण्याचं काम भाजपनेच केलं. मोदी-शहा-फडणवीस-चव्हाण यांनी संधी दिली. आम्हाला कोणी जेलमध्ये टाकलं, कोणत्या केसेस लावल्या हे सगळ्यांना ठाऊक आहे!”यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवरच बोट ठेवलं.

*उपमुख्यमंत्री शिंदेंसाठीही आव्हान — “कणकवलीला येऊन सभा घ्यावी”*

नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही थेट संदेश दिला—“जिल्ह्यात येतात, पण कणकवलीत सभा नाही? कणकवलीतही यावं. उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखासाठी मतदान मागा.”

*एलईडी ट्रॉलर्सवर कठोर भूमिका – “आमच्या राज्यात सहन नाही”*

गोवा–मालवण किनारपट्टीवर वाढलेल्या एलईडी मासेमारीवरही त्यांनी ठाम भूमिका मांडली—

“एलईडीला आमच्या राज्यात थारा नाही. गय नाही. जे येतील ते परत जाणार नाहीत. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो.”

*ओंकार हत्ती, आरोग्य सुविधा, मल्टीस्पेशालिटी – प्रश्न सोडवण्याचं आश्वासन*

ओंकार हत्ती प्रकरणात स्थानिकांच्या भावना आणि वनविभागाच्या प्रक्रियेचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील आरोग्य सुविधात सुधारणा करून मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्याची जबाबदारी आपण घेतल्याचेही त्यांनी जाहीर केलं.शेवटचा संदेश : “२ तारखेपर्यंत संयम… ३ तारखेला जनता उत्तर देईल”“महायुती टिकवण्याची जबाबदारी आमची आहे. मतदारांनी विकास बघून मतदान करावं. निलेश राणेंचा बळीचा बकरा करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल.”अशी ठाम भूमिका घेऊन नितेश राणेंनी पत्रकार परिषद संपवली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!