🛑“माझ्या आजारपणाचा फायदा घेऊ नका; माझा भाजपला पाठिंबा नाही”
*🛑“माझ्या आजारपणाचा फायदा घेऊ नका; माझा भाजपला पाठिंबा नाही”*
*🛑दीपक केसरकरांचा नितेश राणेंवर बेधडक प्रहार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २५:-* सावंतवाडीच्या राजकीय रणधुमाळीत आज एक महत्त्वाचं वळण आलं. भाजपच्या प्रचारसभेनंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी थेट प्रत्युत्तर देत नितेश राणेंवर दमदार प्रहार केला. “सावंतवाडीच्या राजघराण्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. त्यांच्या योगदानाबद्दल नाही माझं कोणतंही दुमत. पण निवडणूक भावनांवर नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढली पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.
केसरकर सध्या आजारी असून घरी आराम करत आहेत. मात्र त्यांच्या आजारपणाचा राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याचे त्यांनी ताशेरे ओढत सांगितले. “मी आजारी आहे, घरी पडून आहे. या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न नितेश राणेंनी करू नये,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
भाजप त्यांच्या पाठीशी असल्याचा, किंवा त्यांनी भाजपला समर्थन दिल्याचा गैरसमज नितेश राणे जाणीवपूर्वक पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “माझा भाजपला कोणताही पाठिंबा नाही. शिवसेनेचं संपूर्ण पॅनल मी उभं केलं आहे. शिवसेनेच्या पॅनेलला दिलेलं मत म्हणजे मला दिलेलं मत,” असा ठाम संदेश देत त्यांनी समर्थकांना स्पष्ट दिशा दिली.नितेश राणेंच्या अलीकडच्या वक्तव्यावरही केसरकरांनी कडाडून प्रतिक्रिया नोंदवली. “त्यांचं वक्तव्य नीतिमत्तेला धरून नाही. सावंतवाडीकरांनी अशा अफवांना आणि खोट्या प्रचाराला बळी पडू नये,” असे ते म्हणाले.
भाजपच्या प्रचारसभेला उत्तर देण्यासाठी केसरकरांनी घेतलेला हा आक्रमक सूर सावंतवाडीतील राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात करणारा ठरत आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याचीच चिन्हे आता स्पष्ट दिसत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

