🛑समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम उद्या चिपळूण दौऱ्यावर.
*🛑समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम उद्या चिपळूण दौऱ्यावर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि- २५:-* समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व मुंबईचे आमदार अबू असीम आझमी उद्या बुधवारी चिपळूण दौऱ्यावर येत असून समाजवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोईन पेचकर आणि प्रभाग क्रमांक ११ चे उमेदवार मन्शु पेचकर यांच्या प्रचारार्थ आणि तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत.
उद्या बुधवारी खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रॅण्ड येथून दुपारी ४ वाजता भव्य मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. मिरवणूक बहादूर शेख नाका येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस, तसेच कावीळतली, मार्कंडी आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करणार आहे.यानंतर मिरवणूक बाजारपेठ, गोवळकोट रोड, गुहागर बायपास मार्गे पुढे सरकेल.तसेच मुमताज बॅंक्वेट हॉल येथे संध्याकाळी ५ वाजता सभा आयोजित करण्यात आली असून, विविध घडामोडींवर मार्गदर्शन तसेच तरुणांना प्रोत्साहनपर संदेश देण्यात येणार आहे.समाजवादी पार्टीचे सदाकत पेचकर यांनी चिपळूण व परिसरातील बंधू-भगिनींना मिरवणूक आणि सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आमदार अबू आजमी हे प्रथमच चिपळूण दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तर अल्पावधीतच समाजवादी पक्षाने चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपले पक्ष संघटन वाढविले आहे त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

