कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑वागदेत गोवा बनावटीची ७ लाखाची दारू जप्त.

*🛑वागदेत गोवा बनावटीची ७ लाखाची दारू जप्त.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २५:-* नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कणकवली तालुक्यात कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीची ७ लाख २० हजार रु. किंमतीची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेले सुमारे ९ लाख ५० हजार रु. किंमतीचे वाहन असा एकूण १६ लाख ७० हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुजरातमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वागदे येथे शनिवारी रात्री करण्यात आली.

कणकवली राज्य उत्पादन शुल्क यांच्या पथकाने शनिवारी रात्री वागदे येथील एसटी थांब्याजवळ संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी जीजे १३ एएक्स ९३०० क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप या चारचाकी वाहनाची तपासणी केली. त्यात गोवा बनावटीच्या ‘डॉ. डॅन श्री एक्स रम’ या बॅण्डच्या ७५० मिली क्षमतेचे एकूण १५० बॉक्स आढळून आले. या मद्याची किंमत ७ लाख २० हजार रु. आहे. अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनही जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजित किंमत ९ लाख ५० हजार रु. आहे.

या प्रकरणी वाहनांमधील आरोपी दिनेशभाई रतनभाई बावलिया आणि भावेशभाई हरजीभाई वाडेर (दोघेही रा. भीमगड, सुरेंद्र नगर, चोटीला, गुजरात) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५ (०३) अन्वये समजपत्र देण्यात आलेले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार, अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कणकवली निरीक्षक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत सहायक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकुर, जवान अजित गावडे, तुषार ठेंबे, वाहनचालक हेमंत वस्त सहभागी झाले होते.तपास निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!