कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑भालचंद्र महाराजांचा ४८ वा पुण्यतिथी महोत्सव २३ पासून.

*🛑भालचंद्र महाराजांचा ४८ वा पुण्यतिथी महोत्सव २३ पासून.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ११:-* भालचंद्र महाराजांचा ४८ वा पुण्यतिथी महोत्सव २३ ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने कीर्तन महोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत दररोज पहाटे ५.३० वाजता समाधी पूजन व काकड आरती, ८.३० वाजता सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी, भालचंद्र महाराज महाभिषेक अनुष्ठान, दुपारी १२.३० वाजता आरती व त्यानंतर महाप्रसाद, दुपारी १ वाजता भजने, रात्री ८ वाजता दैनंदिन आरती होणार आहे.

२३ ते २६ नोव्हेंबरला दररोज सायंकाळी ४ वाजता कीर्तन होणार आहे. २३ रोजी पुणे येथील कौस्तुभबुवा परांजपे यांचे भीष्मप्रतिज्ञा, २४ रोजी जालना येथील प्रणवबुवा जोशी यांचे गर्वहरण, २५ रोजी पुणे येथील संदीपबुवा मांडके रामदासी यांचे भीममाया व २६ रोजी पुणे येथील ज्ञानेशबुवा धानोरकर यांचे ‘रुक्मिणी स्वयंवर’ या विषयावर कीर्तन होणार आहे.

२७ रोजी भालचंद्र महाराजांचा ४८ वा पुण्यतिथी दिन होणार आहे. पहाटे ५.३० वाजता समाधी पूजन, काकड आरती व जपानुष्ठान, त्यानंतर सकाळी ८ वाजता भजने, १०.३० वाजता समाधीस्थानी मनसूक्त पंचामृताभिषेक होणार आहे. दुपारी १२.३० वाजता आरती त्यानंतर महाप्रसाद व भजने होणार आहेत. सायं. ५ वा. पालखीची भक्तगण व सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय यांच्यासमवेत शहरातून भव्य पालखी मिरवणूक व त्यानंतर आरती होणार आहे. रात्री ११ वाजता भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल यांचे ‘पतिव्रतेची पुण्याई’ नाटक होणार आहे. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!