🛑कणकवलीत बॅनरवरून ‘महायुती’त खळबळ!
*🛑कणकवलीत बॅनरवरून ‘महायुती’त खळबळ!*
*🛑शिंदे-निलेश राणे यांचे फोटो गायब, चर्चेला ऊत; “नजरचूक झाली” म्हणाले समीर नलावडे!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ११:-* कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ढालकाठी येथील प्रचार कार्यालय ठरले आहे जिल्हा राजकारणातील ‘हॉटस्पॉट’! सोमवारी रात्री या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या महायुतीच्या कमानीवरील बॅनरवरून मोठी चर्चा रंगली आहे.
दिवसभर या कमानीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे फोटो झळकत होते.
ही कमान म्हणजे भाजप ‘महायुती’च्या संकेताची झलक असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात होतं.
मात्र, सोमवारी रात्री अचानक शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवून नवा बॅनर लावण्यात आला.
नव्या बॅनरमध्ये फक्त मोदी, शहा, फडणवीस, अजित पवार, रवींद्र चव्हाण, नारायण राणे, नितेश राणे, प्रमोद जठार, प्रभाकर सावंत आणि समीर नलावडे यांच्या प्रतिमा ठेवल्या गेल्या.
यामुळे शहरात लगेचच कुजबुज सुरू झाली —“भाजप शिंदे गटाला साइडलाईन करून राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवणार का?”या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे.तथापि, या वादावर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले —
> “तो बॅनर नजरचुकीने लावला गेला होता. कार्यकर्त्यांनी राज्यस्तरीय महायुतीचा प्रोटोकॉल पाहून पहिला बॅनर लावला, पण महायुतीचा निर्णय अद्याप झालेला नाही हे लक्षात आल्यानंतर बॅनर बदलण्यात आला. या घटनेत कोणतेही मतभेद नाहीत.”
या स्पष्टीकरणानंतर वाद शमल्यासारखा वाटत असला तरी, शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सध्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकीकडे विरोधक शहर विकास आघाडीची मोर्चेबांधणी करत आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या बॅनरच्या ‘नजरचुकीनं’ जिल्हा राजकारणात नवा तडका आणला आहे.महायुतीचा बॅनर ‘नजरचुकीचा’ की ‘राजकीय संकेतांचा’?
सिंधुदुर्गमध्ये हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे!
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

