कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीयसिंधुदुर्ग

🛑उमेदवारी अर्जासाठी अवघे सहा दिवस.

*🛑उमेदवारी अर्जासाठी अवघे सहा दिवस.*

 

*🛑ऑनलाईन अर्जासाठी सायबर कॅफेमध्ये गर्दी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- १०:-* मालवण नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. नगरपालिका सभागृहातच निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार आहेत. ही प्रक्रिया १७नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यात १५ व १६ रोजी शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारांना अवघे सहा दिवसच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मिळणार आहेत. यामुळे ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून शहरातील सायबर कॅफेमध्ये गर्दी होताना दिसत आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक असल्याने उमेदवारांकडून पक्षीय आणि अपक्ष असे दोन-दोन अर्ज दाखल करण्यात येत – असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथील काही राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले असताना, मालवण शहरात मात्र अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. नगराध्यक्ष पदाबाबत सस्पेन्स कायम असल्याने अनेक इच्छुकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. काही इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियामार्फत आपली उमेदवारी स्वतःहून जाहीर करत प्रचारास सुरुवात केल्याचेही दिसत आहे. काही उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत.

 

*मुहूर्त शोधण्यासाठी अनेकजण ‘गुरुजीं’च्या द्वारी*

 

उमेदवारी दाखल करण्यासाठी कोणत्या मुहूर्तावर यश मिळेल, यासाठी अनेक इच्छुक उमेदवार सध्या ‘गुरुजीं’च्या द्वारी पोहोचले आहेत. त्यामुळे गुरुजींनी अनेक मुहूर्त काढले असून या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरणे शुभ असल्याचे सांगितले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!