कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कलंबिस्त गावात अविश्वासाचा स्फोट! जिल्हा प्रमुख संजू परब यांची किमया.

*🛑कलंबिस्त गावात अविश्वासाचा स्फोट! जिल्हा प्रमुख संजू परब यांची किमया.*

 

*🛑सरपंच सपना सावंत यांना गावकऱ्यांचा झटका; अडीचशे शिवसैनिकांचा दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* कलंबिस्त गावात काल रात्री एकाच धडाक्यात राजकीय वळण घेतलं! गावच्या शिवसेना सरपंच सौ. सपना सावंत यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना व विश्वासू गावकऱ्यांना न कळवता थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी सरपंचांनाच त्यांच्या गावात जोरदार धक्का दिला आहे.

शिवसेनेचा झेंडा सोडून भाजपमध्ये गेलेल्या सरपंचांच्या या निर्णयानंतर गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर संतप्त झालेल्या सुमारे अडीचशे शिवसैनिकांनी एकजुटीने आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “सपना सावंत यांना आम्ही जीवाचं रान करून सरपंच बनवलं, पण आम्हालाच विश्वासात न घेता त्यांनी पक्ष बदलला. आमचं श्रम, आमचं योगदान दुर्लक्षित झालं. त्यामुळे आज आम्ही एकदिलाने आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी उभे राहतोय.”या प्रवेश सोहळ्यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी गावकऱ्यांचे आभार मानत सांगितले, “कलंबिस्त गावानं नेहमीच आपलं प्रेम दिलं आहे. हे प्रेम मी कधी विसरणार नाही. गावातील रस्ते, पाणी, स्मशानभूमी यांसारखी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जातील. महिलांच्या हातांना रोजगार देण्यासाठी ठोस पावलं उचलू.”

जिल्हाप्रमुख संजू परब यांनी गावकऱ्यांना एकत्र राहण्याचे आवाहन करत सांगितले, “आमदार केसरकर हे कार्यसम्राट आहेत. त्यांनी कधीच पक्षभेद न ठेवता विकास केला. त्यामुळेच ते सलग चार वेळा आमदार झाले. सावंतवाडी मतदारसंघाचा विकास ज्या गतीने झाला, ती गती संपूर्ण सिंधुदुर्गात कुठेच दिसत नाही.”पुढे ते म्हणाले, “आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गावाने पुन्हा एकदिलाने धनुष्यबाणाला विजय मिळवून द्यावा. आम्ही तुमच्या प्रत्येक गरजेच्या वेळी सोबत आहोत.”

या वेळी तालुकाप्रमुख दिनेश गावडे, प्रेमानंद देसाई, प्रशिक्षित मांजरेकर,विनोद सावंत,जीवन लाड, सौ लाड,गावातील मानकरी रमेश सावंत, अनिल देवकरी, अनिल सावंत, भास्कर सावंत, शाहू पासते, पालकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!