आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बांदा येथे एलसीबीची धडक कारवाई : गोवा बनावटीच्या दारूसह सांगलीचे दोघे जेरबंद

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि-०९ :- गोवा-मुंबई महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने आज पहाटे थरारक कारवाईत ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल ₹१२ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये इन्व्होव्हा कार आणि गोवा बनावटीचा दारूसाठा यांचा समावेश आहे.

ताब्यात घेतलेल्यांमध्ये आकाश नामदेव खोत (वय २५, रा. सलगरे, जि. सांगली) आणि विठ्ठल पांडुरंग नाईक (वय ४८, रा. विश्रामबाग, जि. सांगली) या दोघांचा समावेश असून, ही कारवाई आज पहाटे सुमारे ३.३० वाजता बांदा येथील हॉटेल कावेरी परिसरात करण्यात आली.

*तपासणीदरम्यान उघडकीस आला दारूसाठा*

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोवा-मुंबई महामार्गावर नाकाबंदी केली असता, संशयित इनोव्हा कार (क्र. MH-xx-xxxx) तपासणीस थांबवण्यात आली. वाहनाच्या डिकीत पाहणी केली असता गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणावर आढळून आली. तपासणीनंतर या दारूसाठ्याची किंमत ₹२ लाख ११ हजार २०० रुपये असल्याचे समोर आले. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली इन्व्होव्हा कार किंमत ₹१० लाख इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

*नियोजनबद्ध कारवाई*

ही संपूर्ण कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, तसेच पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिसकर यांनी ही कारवाई नियोजनपूर्वक पार पाडली.

*गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू*

या प्रकरणी दोघांविरुद्ध बांदा पोलीस ठाण्यात बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

*“दारू तस्करांवर पोलिसांचा चाप”*

गोवा सीमेजवळून बेकायदा दारू वाहतूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अलीकडेच सीमावर्ती भागात गस्त आणि नाकाबंदी वाढविण्यात आली आहे. बांदा परिसरात पहाटेच्या वेळी एलसीबीने केलेली ही कारवाई त्या मोहीमेचा एक भाग असून, पोलिसांची सतर्कता आणि नियोजनबद्ध पावले यामुळे मोठ्या दारू तस्करीचे जाळे उघडकीस आल्याचे समजते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!