🛑 मळगाव बाजारपेठेतील खड्ड्यांची श्रमदानातून डागडूजी
🛑 मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाचा पुढाकार
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-०९:- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेला लाजवेल असे कार्य मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव बाजारपेठेतील शारदा विद्यालयासमोर गतीरोधकाजवळ रस्त्यावर पडलेल्या लहान व मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी श्रमदानातून मध्यरात्री स्वखर्चाने हे खड्डे सिमेंट-काँक्रीट टाकून बुजविले. शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजन व सामाजिक कार्याची सांगड घालणाऱ्या अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्या या कार्याचे वाहनधारक व ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव बाजारपेठ येथे शारदा विद्यालयासमोर असलेल्या गतीरोधका शेजारी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लहान मोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांबाबत मान्सूनच्या पावसापूर्वीच वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांची अवस्था अधिकच बिकट झाली. चिखलमय व खड्डेमय रस्त्यावरून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. येथे मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात येता अपघाताचा धोका टाळण्यासाठी मागील बऱऱ्याच दिवसांपासून रस्त्यावरील हे खड्डे बुजविण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते तयारीत होते, पण वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे अडथळे येत होते. मात्र आता पावसाचा जोर ओसरताच, सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठल्याही प्रकारची वाट न बघता दिवसा वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी मंडळाने शुक्रवारी एका रात्रीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले. मळगाव येथील सत्ताधारी विरोधक यांच्या कडूनही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता वाखण्याजोगे काम मंडळाच्यावतीने करण्यात आल्याने ग्रामस्थ व वाहनधारकांकडून मंडळाचे कौतुक होत आहे. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे डांबरीकरण करून बुजवावेत, अशी मागणी मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. या श्रमदान कार्यात मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, सचिव उदय फेंद्रे, खजिनदार संदेश सोनुर्लेकर, सल्लागार सचिन सोनुर्लेकर, सदस्य संजय धुरी, स्वप्नील नार्वेकर, उमेश कोंडये, ज्ञानेश्वर राणे, संदिप तेंडोलकर, निलेश चव्हाण आदी सहभागी झाले होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

