समोरुन येणाऱ्या कारला बाजु देत असताना रिक्षाला अपघात होऊन चालकासह प्रवासी जखमी*
*▪️समोरुन येणाऱ्या कारला बाजु देत असताना रिक्षाला अपघात होऊन चालकासह प्रवासी जखमी*
*🖥️Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : रविकांत जाधव*
*🎴कणकवली : दि. १८* समोरुन येणाऱ्या कारला बाजु देत असताना, रिक्षाला अपघात होऊन चालकासह प्रवासी जखमी झाले. कणकवली – आचरा रस्त्यावर फणसनगर सावंतवाडा येथे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
सावंतवाडा येथुन कणकवली आचरा महामार्गावर अचानक आलेल्या कारला बाजु देताना रिक्षा रस्त्यालगतच्या गटारात जाऊन अपघात घडला. अपघातात रिक्षाचे पुढील चाक तुटुन पडले होते. रिक्षाचा टफ ही तुटला होता. रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत झाली, तर आतील प्रवासी महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला कणकवलीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

