कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑वाळूच्या पासासाठी अंतराची किलोमीटर मर्यादा वाढवावी – शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रही मागणी.

*🛑वाळूच्या पासासाठी अंतराची किलोमीटर मर्यादा वाढवावी – शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रही मागणी.*

 

*🛑वाळू पासामधल्या त्रुटींचा वाळू आणि डंपर व्यावसायिकांना फटका, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष! मागण्यांबाबत जिल्हाधिकारी सकारात्मक!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०८:-* वाळू पासामधील त्रुटींबाबत आज शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मा. तृप्ती धोडमिसे यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले आहे. चर्चेनंतर वाळू आणि डंपर व्यावसायिकांच्या या मागण्यांबाबतीत जिल्हाधिकारी मॅडम सकारात्मक असल्याची माहिती शिंदे शिवसेना गटाचे कुडाळ शहर प्रमुख श्री अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी दिली आहे.

या भेटीच्या वेळी जिल्हाधिकारी मा.तृप्ती धोडमिसे यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हंटले आहे की आपल्याकडे उत्खनन होत असलेल्या वाळूपैकी जवळपास ८०% वाळूला कर्नाटक व गोवा राज्यांमधून मागणी असते. या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू पाठवली जाते. मागच्या वर्षी सुरुवातीला पासाच्या अंतराच्या मर्यादेच्या किलोमीटरमध्ये कर्नाटक व गोवा राज्य गृहीत धरले गेले होते होते, परंतु शेवटच्या कालावधीमध्ये यातून कर्नाटक राज्य वगळण्यात आले. त्याचा फटका सर्वसामान्य वाळू व्यावसायिकांना बसला आहे. कर्नाटक राज्यामध्ये सिलिका व क्रश सॅण्ड ही अन्य व्यवसायासाठी वापरली जाते पण प्लास्टरिंग करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील नैसर्गिक वाळूचाच तिथे मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पासाच्या कालावधीमध्ये कर्नाटक राज्य न घेतल्यास तिथल्या प्रशासनाकडून व्यावसायिकांना त्रास होतो. त्यामुळे कर्नाटक हे राज्य पासामध्ये समाविष्ट करावे.

तसेच मिळणाऱ्या पासाच्या कालावधीमध्ये “ब्रेकडाऊन” हा पर्याय ठेवावा. कारण आजमितीस जवळपास ३००० डंपर असून त्याची दुरुस्ती करू शकणारे मेकॅनिकल साधारण फक्त २० एवढी अल्प आहे. त्यामुळे एखादा डंपर बंद पडल्यास त्याची दुरुस्ती लवकर होत नाही व पासाचा कालावधी निघून जातो. याचा फार मोठा फटका डंपर व्यवसायिकांना बसतो आहे. दोन वर्षांपूर्वी “ब्रेक डाऊन” हा पर्याय गृहीत धरला होता. आता तो परत चालू व्हावा अशा आग्रही मागण्या शिवसेना शिंदे गट कुडाळ शहर अध्यक्ष श्री अभिषेक दत्तात्रय गावडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. चर्चेमध्ये या मागण्या जिल्हाधिकारी मॅडमनी समजावून घेतल्या असून या मागण्यांच्या विचाराबाबत त्या सकारात्मक असल्याची माहिती श्री अभिषेक गावडे यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेच्या वेळी कुडाळ शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक कुडाळ नं.प अभिषेक गावडे यांच्यासमवेत तालुका सचिव राकेश कांदे, युवसेना शहर प्रमुख माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, राजवीर पाटील, चंदन कांबळी,संदेश सावंत, विजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!