🛑 पवईत थरारनाट्य : १९ जणांना ओलीस ठेवल्यानंतर रोहित आर्याचा पोलिस एन्काउंटर
🛑 ‘थकित रकमे’वरून सुरू झालं नाट्य-दिपक केसरकर यांच्यावर आरोप
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई , दि-३०:- पवईच्या आर.ए. स्टुडिओ परिसरात गुरुवारी उशिरा रात्री घडलेल्या थरारनाट्याने संपूर्ण मुंबई हादरली. “सरकारनं माझे दोन कोटी रुपये थकवले आहेत” असा आरोप करत रोहित आर्या नावाच्या तरुणाने तब्बल १९ जणांना ओलीस ठेवले, यामध्ये १७ अल्पवयीन मुले आणि दोन प्रौढ व्यक्तींचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या चतुर कारवाईनंतर सर्व ओलीसांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला.
*आरए स्टुडिओत थरार!*
घटनेचं ठिकाण — पवईतील प्रसिद्ध आर.ए. स्टुडिओ. इथेच रोहित आर्याने सायंकाळी अचानक प्रवेश करून सर्वांना ओलीस ठेवलं. पोलिसांना माहिती मिळताच परिसराला वेढा घालण्यात आला. तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी निर्णायक कारवाई केली. यात रोहितचा मृत्यू झाला.
*सरकारने दोन कोटी थकवले’ — रोहितचा आरोप*
संपूर्ण घटनेचा धागा ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या शासकीय योजनेशी जोडला जात आहे. रोहित आर्या या योजनेचा डिझाईनर व स्वच्छता मॉनिटर म्हणून काम करत होता. प्रकल्पातील काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्याचा त्याचा आरोप होता.
त्याने अनेकदा शासन आणि अधिकाऱ्यांकडे थकित रक्कम मागितली, पण प्रतिसाद मिळाला नाही. या मानसिक तणावातूनच त्याने आत्महत्येची चेतावणी दिली होती, मात्र अखेर तो हिंसक मार्गावर गेला.
*दीपक केसरकर यांच्याशी जुना वाद*
रोहित आर्या आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यातील जुना वाद पुन्हा समोर आला आहे. शिक्षणमंत्री असताना रोहितने त्यांच्या घरासमोर उपोषण केलं होतं. त्यावेळी केसरकरांचे स्वीय सहायक मंगेश शिंदे यांच्यावर पैसे थकवल्याचा गंभीर आरोप रोहितने केला होता.
त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे
*दीपक केसरकरांचा खुलासा : “थकीत रक्कम दिली होती, वैयक्तिक मदतही केली”*
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले*
> “रोहित आर्याची थकीत रक्कम विभागाकडून पूर्णपणे अदा करण्यात आली होती. त्याला मी वैयक्तिक मदतही केली होती. मात्र, तो काही काळ मानसिक तणावाखाली होता.”
केसरकरांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना सांगितलं की, “सरकारने किंवा मी कधीही अन्याय केला नाही. त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ.”
*पोलिस चौकशी सुरू*
पवई पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून, रोहित आर्याने केलेले आरोप, प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे आणि शासनाशी असलेले व्यवहार तपासले जात आहेत.मुंबई
पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “ओलिस ठेवणे आणि पोलिसांवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा आहे. चौकशी निष्पक्षपणे केली जाईल.”
*घटनेने राज्यात खळबळ*
सरकारी योजना, थकीत रक्कम आणि मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर घडलेलं हे नाट्य राज्य प्रशासनाला हादरवून गेलं आहे. “काम केलं, पण पैसे मिळाले नाहीत” या मुद्द्याने पुन्हा एकदा शासकीय यंत्रणांतील विलंब आणि अपारदर्शकतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
थरारानाट्याचा शेवट पोलिसांच्या गोळीबारात झाला, पण यातून उघड झालं — अन्याय, दुर्लक्ष आणि मानसिक ताण यांच्या संगमाने समाजात किती धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

