🛑 कुडाळ-मालवणमध्ये युवा सेनाचा नवा जोश
🛑 राजवीर पाटील यांच्याकडे विधानसभा प्रमुखपदाची धुरा!
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-३०:- शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युवा सेनेच्या कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, या नेमणुकीने कोकणातील युवा सेनेत नवा जोश निर्माण झाला आहे. राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना संपर्कमंत्री उदय सामंत आणि कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राजवीर पाटील हे आमदार निलेश राणेंचे कट्टर सहकारी व कार्यकर्त्यांच्या ओळीत अग्रस्थानी गणले जातात. नेहमीच जनतेत राहणारे, युवकांच्या प्रश्नांवर थेट भिडणारे आणि संकटसमयी मदतीला धावून जाणारे म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा मजबूत गट तयार करण्यात आणि युवकांना शिवसेनेच्या विचारधारेकडे आकर्षित करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
या नियुक्तीनंतर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले —
“आमदार डॉ. निलेश राणे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. कुडाळ-मालवण मतदारसंघात युवा सेना संघटना आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करीन. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव मैदानात राहीन.”
युवकांच्या समस्यांवर थेट काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या हाती जबाबदारी गेल्याने स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त होत आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेत नव्या उर्जेची लाट निर्माण झाली असून, “युवक हेच शिवसेनेचं खरं बळ” या विचाराला मूर्त रूप मिळत असल्याची प्रतिक्रिया पक्ष कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
राजवीर पाटील यांच्या नियुक्तीमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेच्या युवा मोर्चाला मोठी गती मिळेल, असा विश्वासही पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

