कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आयुर्वेद कॉलेजात धन्वंतरी जयंतीनिमित्त धन्वंतरी याग.

*🛑आयुर्वेद कॉलेजात धन्वंतरी जयंतीनिमित्त धन्वंतरी याग.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या जानकीबाई सुतिकागृहात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच धन्वंतरी याग करण्यात आला. या संस्थारुपी महाविद्यालयात धन्वंतरी जयंतीनिमित्त धन्वंतरी यागाचे आयोजन करण्यात आले होते.

या रुग्णालयाला नवसंजीवनी मिळावी, यादृष्टीने हा याग करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी धन्वंतरी याग दरवर्षी आयोजित केला जाईल, असे स्पष्ट केले. धनत्रयोदशीदिवशी वैद्यकीय परिवाराचे आदिदेव धन्वंतरी यांची जयंती असते. दरवर्षी सावंतवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात ‘धन्वंतरी जयंती’ विविध उपक्रम व पूजनाद्वारे साजरी केली जाते. धन्वंतरी जयंतीच्या दिवशी धन्वंतरी याग केला जातो.

यावर्षी विशेषत्वाने रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात या धन्वंतरी यागाचे आयोजन करण्यात आले होते. यागाचे यजमानपद कायाचिकित्सा विभागप्रमुख डॉ. नंदादीप चोडणकर यांनी स्वीकारले. यागाचे पौरोहित्य सुधीर कशाळीकर, संदीप मुंडले, सुमित माळवणकर व सचिन जडिये यांनी केले. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात धन्वंतरी पूजनानंतर यज्ञ झाला. राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, कार्यवाह बाळासाहेब बोर्डेकर, संचालक उमाकांत वारंग,वरिष्ठ चिकित्सक डॉ. राजेश गुप्ता, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अॅड. संतोष सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दळवी,महाविद्यालयीन उपप्राचार्य डॉ. ललितकुमार विठलानी व रुग्णालय उपप्राचार्य डॉ. प्रवीण देवऋषी यांच्यासह महाविद्यालय, रुग्णालयातील डॉक्टर्स, शिक्षकेतर कर्मचारी, रुग्णालयीन कर्मचारीवर्ग तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी यज्ञात समिधा समर्पित केल्या. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनीही मान्यवरांसह यज्ञामध्ये आहुती समर्पित केल्या. यापुढेही अशा यज्ञाचे आयोजन धन्वंतरी जयंतीदिवशी व्हावे, अशी इच्छा संस्थेचे अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!