कोकण

🛑ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातून जास्त आघाडी त्यांना भरघोस निधी – नीतेश राणे.

*🛑ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातून जास्त आघाडी त्यांना भरघोस निधी – नीतेश राणे.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २७:-* ज्या ग्रामपंचायतीच्या भागातून सर्वात जास्त ‘लिड’ भाजपच्या उमेदवारास दिले जाईल, त्या ग्रामपंचायतीस सर्वात जास्त निधी दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नीतेश – राणे यांनी आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील मेळाव्यात दिले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू परब, प्रांतिक सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, माजी जि. प.अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, बाबा राऊत, विजय नाईक यांसह या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वप्रथम आडेली जि.प.मतदारसंघात भाजपचा कार्यकर्ता मेळावा कार्यकर्त्यांच्या उत्स्फुर्त सहभागात पार पडला. या मेळाव्यात मनीष दळवी यांनी या मतदारसंघातील पाचही ग्रामपंचायती अधिपत्याखाली आणण्यासाठी भाजपच्या उबाठाकडील वायंगणी व दाभोली या ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच आडेली.जि.प. मतदारसंघातील उबाठा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपात येण्यासाठी घेतलेले परिश्रम हे या मतदारसंघाच्या निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींनी भाजपच्या उमेदवारांस मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी कामास लागा. या मतदारसंघास योग्य उमेदवार देण्यासाठी मी कटीबध्द राहीन, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योजना व मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केलेल्या राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवून घराघरांत लाभदिलेला आहे. त्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व खासदार नारायण राणे यांनीही विकासनिधीतून अनेक कामे केलेली आहेत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते सातत्याने नागरिकांशी संवाद साधून आहेत.

आपण आपल्या भागातील लोकांसाठी केलेल्या कामामुळे भाजप व त्याचे उमेदवार है विकासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आजपासून कामास लागा, असे आवाहन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!