कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसिंधुदुर्ग

🛑आवैद्य दारूचा महापूर गावागावात! पोलिस झोपलेत की आपणच मुके झालो?

*🛑आवैद्य दारूचा महापूर गावागावात! पोलिस झोपलेत की आपणच मुके झालो?*

 

*🛑गावच्या पोलिस पाटील,व पोलीस बीट अंमलदाराची जबाबदारी काय?*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २३:-* सिंधुदुर्गचा कोकण — निसर्गाने जणू सोन्याचा तुकडा बनवला असा प्रदेश.फरमेश्वराला पहाटेला पडलेले एक गोड स्वप्न म्हणजे आपला कोकण,नदी नाले,डोंगर, समुद्र, शेती आणि शांत, संस्कारित माणसं — ही या भूमीची ओळख. पण गेल्या काही वर्षांत या कोकणच्या हिरवळीत एक काळा डाग पसरत चाललाय. तो म्हणजे — “गोवा बनावटी दारू”, गांजा आणि नशेचा वाढता बाजार! गावोगावी हा व्यापार बिनधास्त सुरु आहे. आणि दुर्दैव असं की — दारू विकणारे बिनधास्त, पिणारे बेफिकीर, आणि पोलिस सुशेगाद झोपलेत!आणि प्रश्न असा आहे झोपेचे सोंग घेतलेल्याना उठवणार कसे..कानात उकळते तेल घालून म्हणजेच असेच सडेतोड लिखाण करून.

*गोवा बनावटी विषारी दारूचा महापूर*

पूर्वी दारू म्हणजे शहरातल्या काही रेस्टॉरंटपुरती व गावात एखाद दुसरी गरजे पुरती हातभट्टी एवढीच मर्यादित गोष्ट होती. पण आता चित्र उलटं झालंय. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरीसारख्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गावात “गोवा बनावटी” दारू सहज उपलब्ध आहे. ५० ते १०० रुपयांत बाटल्या विकल्या जातात, आणि हे धंदे गावकऱ्यांच्या नाकाखालीच सुरु आहेत ,गावात एखादा बारस असेल,लग्न असेल, वाढदिवस असेल दारूशिवाय कार्यक्रम पूर्णच होत नाही.ही दुर्दशा आहे संस्कृतीची.लोक म्हणतात “थोडी दारू घेतली तर काय होतं?” पण वास्तव असं की, थोड्यानेच सुरु झालेला हा नशेचा प्रवास आयुष्यभरासाठीची गुलामी बनतो आणि आपल संपूर्ण आयुष्य राखरांगोळी करुन टाकतो.

*पोलिस आणि प्रशासनाची झोप*

अवैध दारू विक्री हा गुन्हा आहे. पोलिसांना त्याची माहिती असतेच. पण तरीही कारवाई होत नाही. कारण काही ठिकाणी “वरून दबाव”, काही ठिकाणी “स्थानिक राजकीय हस्तक्षेप”, आणि काही ठिकाणी “स्वतःचा फायदा”.अनेक बीट अंमलदारांना गावात कोण दारू विकतो हे ठाऊक असतं व त्यांच्याच आर्शिवादाने हे बिनधास्त सुरू असतं, म्हणुनच त्यांना हलकंही “गंभीरपणे” घ्यावंसं वाटत नाही.पोलिसांचा हे मौन म्हणजे गुन्ह्याला अप्रत्यक्ष पाठबळ!गावात नशेचा व्यापार वाढतोय, यासाठी गावचा पोलीस पाटील व त्या गावच्या पोलीस बीट अंमलदाराला जबाबदार धरलं पाहिजे. केवळ अहवाल लिहिणं पुरेसं नाही — नशेबाज पकडला नाही, तर बीट अंमलदार कार्यमुक्त झाला पाहिजे.

*पोलीस पाटीलची जबाबदारी की शोभेसाठी पद?*

पोलीस पाटील हे गावाचे डोळे आणि कान आहेत. शासन त्यांना सन्मानाने मानधन देतं. पण आज बऱ्याच गावांत हे पद केवळ नावापुरतं राहिलंय.गावात चोरी झाली, दारू विकली गेली, गांजाची देवाणघेवाण झाली — तरी पोलीस पाटील गप्प!

त्यांना भीती असते, “गावात बदनामी होईल”, “कोणी नाराज होईल”, किंवा “राजकीय बॉस खुश राहणार नाही.”

पण असा पाटील गावाच्या काय उपयोगाचा?शासनानं अशा निष्क्रिय पाटलांना त्वरित कार्यमुक्त करून जबाबदार नागरिकांना संधी द्यावी.गावातील चुकीच्या गोष्टी थांबवणं ही त्याची जबाबदारी आहे, फक्त सणवाराला पंच म्हणून बसणं नाही.

*वेर्ले गावाचं उदाहरण — आत्मभानाची जागृती*

या काळोखातही काही गावांनी सामाजिक जबाबदारीचं उत्तम उदाहरण घातलंय.वेर्ले गावात ग्रामस्थांनी ठराव केला — “लग्न, बारसा, वाढदिवस कुठलाही कार्यक्रम असो, दारू द्यायची नाही आणि विकायची नाही!”हा ठराव म्हणजे केवळ दारूविरोधी पाऊल नाही, तर संस्कृती आणि पुढील पिढी वाचवण्याचा संकल्प आहे.अशी भूमिका आता प्रत्येक ग्रामपंचायतीनं घ्यायला हवी.दारू विकणाऱ्या किंवा नशेचा व्यापार चालवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात ठराव करून त्यांना गावात बहिष्कृत केलं पाहिजे.गावाला स्वच्छ ठेवायचं असेल, तर नशेमुक्तीचा झेंडा प्रत्येक घरावर फडकायला हवा.

*व्यसनाचा शाप – तरुणाईचा नाश*

दारू आणि गांजामुळे आज गावातील तरुणाई धोक्यात आहे.शेतीकडे दुर्लक्ष, शिक्षणात उदासीनता, घरगुती वाद, भांडणं — हे सर्व दारू मुळे घडत आहे.कित्येक तरुण रोज रात्रीच्या नशेत रस्त्यावर दिसतात. पालक असहाय, आणि समाज मौन बाळगून गप्प,ज्या दिवशी हे लोण प्रत्येकाच्या घरा पर्यंत पोहोचतील तेव्हा जाग येईल,पण वेळ गेलेली असेल ही मौनसंमती म्हणजे समाजाचं व आत्महत्या पत्र!जर आज आपण बोललो नाही, तर उद्या आपली मुलं या विषाच्या विळख्यात सापडतील.दारू विकणारे गुन्हेगार आहेत, पण शांत बसणारे नागरिक त्याहून मोठे दोषी आहेत.

*गावपुढाऱ्यांची बेफिकीरी*

गावपुढाऱ्यांची एक नवी जात तयार झाली आहे —“शहरात राहायचं, पण गावाचं राजकारण करायचं.”हे पुढारी शहरात बंगल्यात, एसीत बसून गावातील मतदारसंघ चालवतात.गावात दारू विक्री, रस्त्यावर स्मोकर, रात्री नशेत मारामाऱ्या — या सर्व गोष्टींवर त्यांचं लक्ष नसतं,गावाची तरुण पिढी उद्ध्वस्त होतेय, पण पुढाऱ्यांना फक्त निवडणुकीतील मतसंख्या आणि सभेतील माईक महत्त्वाचा वाटतो.

अशा बेफिकीर नेत्यांपेक्षा गावातील एक सजग नागरिक पुढे येऊन हे वास्तव ग्रामस्थां समोर मांडून,गावातील जनतेच्या सुखदुःखात जो सहभागी होतो,आपल्या प्रजेबरोबर गावातच राहतो, पावसाळ्यात आठ आठ दिवस काळोखात राहतो,२४ तास गावांसाठी उपलब्ध असतो अशाच उमेदवाराला मतदान करावे तरच गाव सक्षम होऊन मतदार संघाचा विकास होईल.

*उपाय आणि दिशा*

प्रत्येक ग्रामपंचायतीने दारूविक्री व नशाविरोधी ठराव करून तो सार्वजनिकरित्या अंमलात आणावा. पोलीस व प्रशासन जबाबदार: बीट अंमलदार आणि पोलीस पाटील यांच्या कामगिरीचे तिमाही पुनरावलोकन करावे.गावोगावी “नशामुक्त युवा संघ” स्थापन करून जनजागृती करावी.पालक आणि शिक्षक यांची भूमिका: शाळांमध्ये नशेच्या दुष्परिणामांवर नियमित मार्गदर्शन सत्रे घ्यावीत.माहिती देणाऱ्यांना संरक्षण: अवैध दारू विक्रीची माहिती देणाऱ्या नागरिकांना संरक्षण व बक्षीस द्यावे

*”निष्कर्ष — “गाव वाचवा, पिढी वाचवा”*

गावोगावी आज दारूचा महासाप फणा काढून उभा आहे. तो फक्त नशेबाजाचा नाही, तर समाजाच्या प्रत्येक कुटुंबाचा शत्रू आहे.

दारू विकणारे काही जण आहेत, पण ती थांबवणारे हजार होऊ शकतात — जर आपण निर्धार केला तर!गावाचा पोलीस पाटील सजग असावा, बीट अंमलदार जबाबदार असावा, आणि नागरिक निर्भीड असावेत.गावातील व्यसनमुक्त वातावरण म्हणजेच खरी विकासाची सुरुवात आहे.

> “दारूचा धंदा बंद करा, गावात पुन्हा माणुसकी जागवा!”

सिंधुदुर्गचा प्रत्येक नागरिक जर आज आवाज उठवेल, तर उद्या प्रत्येक गाव “वेर्ले”सारखं होईल — दारूमुक्त, नशामुक्त, आणि संस्कृतीपूर्ण.

हीच खरी दिवाळी — अंधारावर प्रकाशाची, आणि नशेवर सजगतेची!

यावर प्रत्येक नागरिकाने विचार करून ही गोवा बनावटी विषारी दारू,गावात सहज उपलब्ध होणारा गाजा कायमचा हद्दपार करूया हीच खऱ्या अर्थाने दिवाळी होईल.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!