🛑कारीवडेत भाजपचा निवडणूक रणघोष!
*🛑कारीवडेत भाजपचा निवडणूक रणघोष!*
*🛑कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडला प्रत्येक बुथवर विजय आपलाच” निर्धार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २३:-* कारीवडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील कारीवडे पंचायत समिती मतदारसंघातील कारीवडे, कुणकेरी आणि आंबेगाव या गावांमधील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य बैठक आज कारीवडे येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीत भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडळ अध्यक्ष संतोष राऊत, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आरीवडेकर, माजी नगरसेवक परिमल नाईक, मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, प्रमोद सावंत, कारीवडे सरपंच, आंबेगाव सरपंच, कुणकेरी उपसरपंच सुनील परब, शक्ती केंद्रप्रमुख आनंद तळवणेकर, कुणकेरी शक्ती केंद्रप्रमुख कृष्णा उर्फ बाळा सावंत, तसेच सर्व बुथ अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष प्राजक्ता केळुस्कर, प्रमुख पदाधिकारी केशव साहिल बाळा गावकर, विकास संस्थांचे सर्व चेअरमन आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी “प्रत्येक बुथवर जाऊन थेट जनतेशी संवाद साधा, पक्षाचा संदेश घराघरात पोहोचा” असा निर्धार व्यक्त केला. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करावा, यासाठी बूथस्तरावर संघटन अधिक बळकट करण्याचे ठोस नियोजन या बैठकीत करण्यात आले.
*भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी यावेळी सांगितले*,
> “या निवडणुकीत आपला मुकाबला कुणाशी नाही, तर स्वतःशी आहे. प्रत्येक कार्यकर्ता जर आपली जबाबदारी ओळखून कामाला लागला, तर कोलगाव मतदारसंघात कमळ फुलणारच!”
कार्यकर्त्यांनी “जय भाजप, जय कमळ!” च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. बैठकीत भविष्यातील प्रचार नियोजन, बुथ स्तरावरील संघटनात्मक बांधणी, नवमतदारांशी संपर्क मोहिम, तसेच महिला व युवक कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये अवर्णनीय ऊर्जा आणि आत्मविश्वासाची लाट पाहायला मिळाली. प्रत्येक बुथवर विजय निश्चित करण्याचा संकल्प करत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने ठरवले की
> “या निवडणुकीत भाजपचा उमेदवारच विजयी ठरणार, आणि कारीवडेपासून कोलगावपर्यंत भगवा फडकणार!”
कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडला, गावागावात प्रचाराचा बिगुल वाजला!“प्रत्येक बुथ आमचा किल्ला” भाजपची रणनिती ठरली!स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार!
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

