कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राज्य शासनाचा निर्णय: उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती

*राज्य शासनाचा निर्णय: उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती*

,*प्रांताधिकारी हेमंत निकम यांची अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती*

मुंबई, दि. २० ऑक्टोबर २०२५ (माझा सिंधुदुर्ग डिजिटल वृत्तसेवा):
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने निवडसूची वर्ष २०२५-२०२६ करिता उपजिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती व पदस्थापना देण्याचा शासन आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार श्री. हेमंत विठ्ठलराव निकम, उप संचालक, भू अभिलेख जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांना अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची पदस्थापना पुणे येथे श्री. राजेंद्र गोळे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर करण्यात आली आहे.
महसूल व वन विभागाचे उप सचिव महेश वरुडकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या आदेशात नमूद करण्यात आले आहे की,
सदर पदोन्नती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, ती विविध न्यायालयीन प्रकरणांतील (सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) अंतिम निर्णयाच्या अधीन राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!