🛑 ‘आकाश कंदील २०२५’ डिजीटल दिवाळी विशेष अंकाचे श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते प्रकाशन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴आचरा, दि-१९:- मालवण तालुक्यातील, श्री जयंतीदेवी मंदिर, पळसंब येथे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या ‘आकाश कंदील २०२५’ डिजीटल दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच माजी सरपंच आणि श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब संस्थेचे सचिव चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. देवी जयंती चरणी प्रार्थनेसह पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित, आकाश क॔दील दिवाळी विशेष अंकाचे संकल्पक ॲड. सहिष्णू पंडित, रचना संयोजन प्रमुखअमिया बांदेकर व कार्यकारी संकलन प्रमुख सानिका वायंगणकर उपस्थित होते.
यावेळी ॲड. सहिष्णू पंडित यांनी ‘आकाश कंदील २०२५’ दिवाळी अंकाच्या निर्मितीमागील संकल्पना स्पष्ट केली. तसेच यावेळी श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल व आकाश कंदील अंकाच्या टीमची प्रशंसा केली आणि वाचकांसाठी ही एक उपयुक्त दिवाळी भेट असल्याचे सांगितले. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी संबंधित सर्वांना सदिच्छा दिल्या.
ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वाचनाद्वारे कोकणची संस्कृती समजून घेताना कोकणच्या भूमीविषयी आपली पूजनीय कृतज्ञता वाढत राहील. युवा पिढीने पुढाकार घेऊन साकार केलेल्या आकाश कंदील २०२५ च्या सहकारी सदस्यांना त्यांनी यापुढील अंकात विविध विषय व लेखनाचे प्रकार अंकात समाविष्ट करावे असे सूचित केले. दिवाळी विशेषांकाचे संकल्पक ॲड. सहिष्णू पंडित, ॲड. अमिया बांदेकर व सानिका वायंगणकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि यंदाच्था अंकाच्या निर्मितीचा व मागील अंकाच्या प्रतिक्रियांचा आढावा घेतला .
‘आकाश कंदील २०२५’ दिवाळी अंकाला ज्येष्ठ कलाकर्मी व कोकणातील मुंबईस्थित ज्येष्ठ साहित्यिक तसेच पळसंब गावचे समाजसेवी श्री. गिरीधर पुजारे यांची प्रस्तावना लाभली आहे. यामध्ये श्री. नितीन गावडे, सौ. निता सावंत, कु. महेक शेख, कु. श्रावनी गावडे, सौ. आदिती मसुरकर, डॉ. वैदेही दप्तरदार, सौ. स्नेहा नारिंगणेकर आणि सौ. अनुष्का रेवंडकर यांचे लेख समाविष्ट आहेत.
यावेळी देवस्थान मानकरी श्री.अरुण पुजारे यांच्याकडून ‘भगवतगीता’ पुस्तक मंदिरातील वाचनालयाला देण्यात आले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी त्यांची ‘दीपमाळेची फुले’ व डॉ. प्रशांत पटवर्धन यांचे ‘नवनिर्मितीचे ऋषी परशुराम’ ही पुस्तकं श्री. जयंती देवी वाचनालयाला भेट दिली.
यावेळी प्रमुख मान्यवरांसह आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूहाच्या संचालक सौ. फिलोमीना पंडित, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अमरेश पुजारे, देवस्थान मानकरी श्री. अरुण पुजारे, राजन पुजारे, गणेश पुजारे, भजनी बुवा अनिल परब, अमित पुजारे, दादा पुजारे, अशोक जुवेकर, दाजी जुवेकर, रुपेश पुजारे, श्री. मोर्वेकर, आशा सेविका सौ. तनुजा परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
‘आकाश कंदील २०२५’ हा डिजीटल अंक आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या पोर्टलवर प्रत्येक बातमी व लेखाला डिजीटली जोडलेला आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

