आणखीकरियरमालवणशैक्षणिकसिंधुदुर्ग

स.का. पाटील विद्यालय मालवणातील भव्य मेळाव्यात कु.सिमरन व कु.वेदांती विद्यार्थी गौरव पुरस्काराने सन्मानित..

▪️शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय,शिक्षकेतर कर्मचारी संघाकडून कौतुक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴मालवण,दि.१६: सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघ, आयोजित स.का. पाटील विद्यालय मालवण येथील भव्य मेळाव्यात ॲड. चेतनदादा पाटील (उच्च न्यायालय मुंबई, प्रदेशाध्यक्ष कोळी महासंघ) यांच्या शुभहस्ते बीएएमएस पदवी संपादन केलेली कु. सिमरन नानचे व इयत्ता दहावीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवलेली सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. वेदांती नानचे या दोन्ही बहिणींना विद्यार्थी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कु. सिमरन व कु. वेदांती ह्या शिक्षक संघटनेचे जिल्हा सचिव तसेच शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर चे लिपिक श्री. गजानन नानचे यांच्या कन्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा (नोंदणीकृत) भव्य मेळावा रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०:३० वा. स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधव यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्तीपात्र, इ. १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण, उच्च शिक्षण पदवी प्राप्त, शिक्षकेतर कर्मचारी पाल्य यांचा विद्यार्थी गौरव करण्यात आला. तसेच प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रत्येक तालुक्यातून एक लिपिक व एक चतुर्थ श्रेणी आदर्श शिक्षकेतर कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. संघटनेच्या सुरुवातीला ज्या शिक्षकेतर बांधवांनी संघटनेत मोठे योगदान दिले त्यांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक आजोबा क्षेत्राधिकारी, आरवली सोन्सुरे संस्था. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. चेतनदादा पाटील, उच्च न्यायालय मुंबई प्रदेशाध्यक्ष कोळी महासंघ. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सतिश नाडगौड, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, खाजगी शाळा, शिक्षकेतर संघटना श्री. व्ही.आर. डगरे, अध्यक्ष, सिं.जि.माध्य उच्च माध्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्म.पत., सिंधुदुर्गनगरी. श्री. उमेश सुकी, माजी सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघ. श्री. आनंद लोके, माजी अध्यक्ष, सिंधुदुर्ग शिक्षकेतर संघटना. श्रीम. गायत्री सातोस्कर, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, रेडी. श्री. अनिल राणे, अध्यक्ष, सि.जि.माध्य., उच्च माध्य. व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्म, संघ. श्री. सुहास देसाई, उपाध्यक्ष, श्री. गोपाळ चौकेकर, उपाध्यक्ष. श्री. बी. बी. चव्हाण कार्याध्यक्ष, श्री. प्रदिप सावंत, सहसचिव. कार्यक्रमाचे निमंत्रक श्री. गजानन नानचे, सचिव. श्रीम, धनश्री गावडे, उपाध्यक्ष. राज्यप्रतिनिधी, श्री. पांडुरंग दळवी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!