Uncategorizedकोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जामसंडे बाजारपेठेत ३८ हजाराचा गुटखा जप्त.

*🛑जामसंडे बाजारपेठेत ३८ हजाराचा गुटखा जप्त.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०९:-* जामसंडे बाजारपेठ येथे सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे ३८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित अनिकेत रामचंद्र लाड (२५) याच्याविरुद्ध अन्नसुरक्षा मानके कायद्यांतर्गत शरीरास विघातक पदार्थ विक्री व साठा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे बाजारपेठ येथे गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. या आधारे सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, हवालदार प्रकाश कदम, आशिष गंगावणे, किरण देसाई, ज्ञानेश्वर तवटे, महिला पोलीस अंमलदार स्वाती सावंत यांच्या टीमने जामसंडे बाजारपेठ येथे छापा टाकून तेथील अनिकेत लाड याच्या दुकानाच्या मागील बाजूस विक्रीच्या उद्देशाने केलेला गुटख्याचा साठा जप्त केला. हा गुटखा सुमारे ३७ हजार ८४४ रुपये किमतीचा आहे. घटनेची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे हवालदार गुरुनाथ तवटे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली.

 *सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

          _*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

http://kokanlivebreaking.live

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

     _अचूक बातमी थेट हल्ला_

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!