🛑 फसवणुकीचे खरे सूत्रधार राजन तेलीच ; भाजप जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांचा आरोप
🛑 “दुसऱ्यावर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःची फसवणूक आठवा,” दळवींचा टोला
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग, दि-०९:- फसवणुकीचे खरे सूत्रधार माजी आमदार राजन तेली आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांनी केला आहे. दुसऱ्यावर बोट दाखविण्यापूर्वी आपण स्वतः किती लोकांची फसवणूक केली आहे, याचे आत्मपरीक्षण राजन तेलींनी करावे, असा सल्ला दळवी यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर आरोप करणे म्हणजे “उंटावरून शेळी हाकण्याचा प्रकार” आहे. राजन तेलींनी ज्याचं प्रतिनिधित्व केलं तीच सिंधुदुर्ग जिल्हा बँक, त्याच बँकेची बदनामी स्वतःच्या स्वार्थासाठी करणे योग्य नाही.
“फसवणूक करणे हा राजन तेली यांचा धंदा आहे. खोट्या पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न थांबवा, अन्यथा आम्ही ते सहन करणार नाही,” असा इशाराही दळवी यांनी दिला.
सुधीर दळवी यांनी पुढे आरोप केला की, राजन तेली हे ज्या-ज्या पक्षात गेले, तिथे तिथे त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांची फसवणूक केली आहे. आपल्या स्वार्थासाठी त्यांनी सतत पक्षांतराची सवय लावली आहे. अगदी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही त्यांनी वेळोवेळी फसवले आहे.
“सिंधुदुर्ग बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक आहे, त्यामुळे विनाकारण बँकेची बदनामी नको,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

