कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सोशल मीडिया वरून बदनामी केल्याच्या रागातून कुटुंबाला वाळीत टाकले…,* *🛑 पीडित कुटुंबाची पोलिसात तक्रार दाखल.

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि२ऑक्टोबर- :-*
गावातील प्रमुख मानकऱ्यांना सोशल मीडिया द्वारे जाब विचारल्याच्या कारणाने एका गावातील युवकाला व त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचे प्रकरण सावंतवाडी तालुक्यातील एका गावात घडले संबंधित युवकाने त्या मानकऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. संबंधित युवकाने बॅनरबाजी विरोधात सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आपले मत प्रसारित केले होते. त्या व्हिडिओद्वारे देवस्थान मधील प्रमुख मानकऱ्यांची बदनामी झाली असे समजून त्या प्रमुख मानकऱ्यांनी संबंधित युवक व त्याच्या कुटुंबीयांना मंदिरात बोलावले होते मात्र आपल्या व्यवसायानिमित्त बाहेरगावी असल्याने तसेच गावात नवरात्रीचा उत्सव सुरू असल्याने हा उत्सव संपल्यानंतर आपण यावर चर्चा करू असे त्या युवकाने सांगितले व ज्या दिवशी त्याला मंदिरात बोलवले होते त्या दिवशी त्या युवकाचे वडील तेथे गेले मात्र संबंधित युवक न आल्याने आपला मान ठेवला गेला नाही व आपला अपमान केला गेला त्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले जाईल अशी माहिती त्या युवकाच्या वडिलांना दिली .या घटनेचा मानसिक दबाव युवकाच्या कुटुंबीयांवर पडल्याने शेवटी त्या युवकाने पोलिसात तक्रार दाखल केली . कोकणातील प्रत्येक गावात गावराठी प्रमाणे मानकरी असतात व देवस्थानातील सर्व कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात बऱ्याच वर्षापासून ही परंपरा चालत आली असून या प्रमुख मानकरऱ्यांना गावात देवस्थान चालवण्याची मोठी जबाबदारी असते मात्र बदलत्या काळानुसार आता अनेक रूढी परंपरा जपताना शासकीय नियम आडवे येतात त्यामुळे शासकीय नियम आणि गावातील परंपरा याचे योग्य रीतीने सांगड घालून ग्रामस्थ व प्रमुख मानकरी यांनी गावराठी चालवणे गरजेचे बनले आहे. अशावेळी ग्रामस्थ व मानकरी यांच्यामध्ये अनेकदा गैरसमजुतीने वाद निर्माण होतात तेव्हा ते वाद सामोपचाराने तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यासाठी एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे हा पर्याय होऊ शकत नाही. शासकीय कायद्यानुसार एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा समजला जातो. त्यामुळे असे वैचारिक मतभेदातून तयार झालेले वाद सामंजस्याने न सोडवल्यास अशा घटना घडत राहतील आणि त्याने कोकणातील पारंपारिक गावराठी लोप पावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!