कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑इन्सुलीत पट्टेरी वाघाचे दर्शन.

*🛑इन्सुलीत पट्टेरी वाघाचे दर्शन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बांदा, दि- ०२:-* मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून अगदी जवळ, सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली क्षेत्रफळवाडी नजीकच्या जंगलात पट्टेरी वाघाच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या अगदी बाजूला असलेल्या एका खडकावर हा भव्य पट्टेरी वाघ दिसल्याने या भागातील त्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेली अनेक वर्षे या संवेदनशील नैसर्गिक पट्ट्याला ‘इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यासाठी लढणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या संघर्षाला मिळालेले मोठे बळ आहे. सावंतवाडी आणि माजगावनजीकच्या या भागामध्ये मोठे राखीव जंगल आहे. या जंगलात पट्टेरी वाघाचा वावर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये नेहमीच होत होती. मंगळवारी सकाळी रस्त्याने जाणाऱ्या काही प्रवाशांना हा पट्टेरी वाघ अत्यंत शांतपणे खडकावर बसलेला दिसला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद होताच त्याची माहिती वेगाने पसरली. वनविभाग तसेच पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या पट्ट्यातील वाघांचे वास्तव्य सिद्ध झाल्याने येथील जैविक समृद्धी आणि वन्यजीव संरक्षण यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आता स्पष्ट झाली आहे. सावंतवाडी आणि दोडामार्गच्या सह्याद्रीच्या पट्ट्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व आहे, हे सत्य गेली अनेक वर्षे वादग्रस्त ठरले आहे. पूर्वी वनविभाग या भागात वाघांचे अस्तित्व सातत्याने नाकारत होता. यामागे स्थानिक भागातील नियोजित मायनिंग प्रकल्पांना अडथळा निर्माण होऊ नये, हा मुख्य हेतू होता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. वाघाचे अस्तित्व अधिकृतपणे मान्य झाल्यास या भागाला वन्यजीव संरक्षण कायद्याखाली विशेष दर्जा द्यावा लागेल. मायनिंगसारख्या विकास प्रकल्पांना ब्रेक लागेल, या भीतीने हे वास्तव दुर्लक्षित केले जात होते. मात्र, पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक या सत्यावर ठाम होते. वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद, संदीप सावंत यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी वाघाच्या अस्तित्वाबाबत वेळोवेळी वनविभागाशी संघर्ष केला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!