आणखीकोकणमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 माफियांचा सिंधुदुर्गावर कब्जा की लोकशाहीचा?

🛑 साप साप म्हणून भुई थोपटण्या पेक्षा वास्तव स्वीकारून सामोरे जावा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ संपादकीय : सीताराम गावडे

🎴सिंधुदुर्ग, दि-२८:-

सिंधुदुर्गात अंमली पदार्थांचा महासाप फणा उगारून उभा आहे.५३ नामांकित डॉक्टर्सनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं निवेदन हे उगाच नाही रुग्ण तपासताना त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलेलं भयावह चित्र आहे ते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलं “अंमली पदार्थ समुद्रमार्गे येतात आणि त्यामागे माफिया आहेत.”मग आता प्रश्न सरळ आहे हे माफिया कोण आहेत? त्यांना आश्रय देणारे राजकीय, आर्थिक आणि पोलिसीय हात कोणाचे आहेत?

आम्ही जेव्हा या विषयावर लेखणी उगारली, तेव्हा काही तथाकथिता़ची झोप उडाली.काही व्यावसायिकांना फीतवून

त्यांनी तातडीच्या बैठका घेतल्या, “निषेध” नावाखाली पोलिसांकडे माझ्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.आणि चिवला बीचवरील एका होमस्टे मालकाने फोन करून “हप्ते घेतात” असा गलिच्छ आरोप करत तो ऑडिओ व्हायरल केला.ही केवळ बदनामी नाही, हा पत्रकारांचा गळा दाबण्याचा गुन्हा आहे.

सिंधुदुर्गात अंमली पदार्थांचा पूर येतोय हे साऱ्यांना माहिती आहे.

कॉलेजमधील युवक नशेच्या आहारी गेलेत,३२ वर्षाच्या तरुणाचा अंमली पदार्थांच्या डोसने मृत्यू झाला,

डॉक्टर्स रोज नशेखोरीत बळी पडलेले रुग्ण पाहतायत.म्हणजे ही समस्या हवेतील धूर नाही, तर प्रत्येक घराची स्फोटक वास्तविकता आहे.

पण जेव्हा सत्य बाहेर आलं, तेव्हा काहींच्या पोटात दुखायला लागलं. का? कारण त्यांचा धंदा धोक्यात येईल.पर्यटनाच्या नावाखाली चालणारे होम-स्टे, परवानगी आहे की नाही हेही तपासायला कोणी तयार नाही.प्रशासन डोळेझाक करतंय, आणि माफियांची माळ सिंधुदुर्गाच्या गळ्यात टाकली जातेय.

हे स्पष्ट सांगतो सिंधुदुर्गात अंमली पदार्थांचा महासाप फक्त माफियांमुळे जिवंत नाही, तर प्रशासनाच्या ढिलाईमुळे आणि राजकीय छत्रछायेमुळे फोफावलाय.

आजच्या घडीला मागणी ही आदेशासारखीच असावी मालवण समुद्र किनाऱ्यावरील सर्व होम-स्टेची शासनमान्यता तात्काळ तपासा.बेकायदेशीर असलेले व्यवसाय सीलबंद करा.अंमली पदार्थांचा समुद्रमार्ग रोखण्यासाठी बंदर, बोटी, जलवाहतूक यांची चौकशी करा.पत्रकारांना बदनाम करणाऱ्यांविरुद्ध त्वरित गुन्हे नोंदवा.

जिल्ह्यातील माफियांना राजकीय आश्रय देणाऱ्यांचा पर्दाफाश करा.

लोकशाहीचा चौथा स्तंभ गप्प बसवून माफियांची मस्ती चालणार नाही. जे सुजाण नागरिक माझ्या मागे ठामपणे उभे आहेत त्यांचाच आवाज या प्रशासनाच्या कानठळ्या बसवेल.

सिंधुदुर्गाला नशेखोरीच्या दलदलीत लोटणाऱ्यांना स्पष्ट इशारा वाघ अजून जिवंत आहे, आणि या मातीत सिंहासन मिळवून दिलेल्या शिवरायांच्या वारसांना तुम्ही घाबरवू शकत नाही.आम्ही झुकणार नाही.

सत्य लिहिणं हे आमचं अपराध नाही, तर आमचं कर्तव्य आहे.माफियांच्या सावलीत जगणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं सिंधुदुर्ग कोणाच्याही बापाची जागीर नाही, आणि आम्ही हा जिल्हा नशेखोरांच्या ताब्यात देणार नाही!

आम्ही लिहिल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सजग नागरिकांनी जे आम्हाला गेली पस्तीस वर्षे ओळखतात त्यानी मला लांडगे रानकुत्रे घेरु पाहताहेत, चक्रव्यूहात अडकायला मी अभिमन्यू नाही या आग्रलेखाची खाली ..तोच मराठा, जो लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या शाहिस्तेखानासमोर,

शंभर हत्तींच्या बळाचा डोंगराएवढ्या अफजलखानासमोर, संपूर्ण हिंदुस्तान जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या औरंगजेबासमोर नाही झुकला…तो या कलियुगातील किरकोळ नरकासुरांसमोर झुकणार?? निव्वळ गैरसमज !!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताची ही परंपरा आहे… वाघ तो वाघच !!! अशा आशयाचे माझ्या शेकडो समर्थकांनी स्टेटस ठेवून माझा आत्मविश्वास वाढवला.सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण,देवगड आदी भागातील सुजाण नागरिकांनी पाठींबा दिला त्यासर्वांचे मनापासून आभार..

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!