आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 गोवंश मांसाची अवैध वाहतूक उघडकीस ; २९० किलो मांस जप्त, दोघांना अटक

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२७:-  कर्नाटकहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा झायलो वाहनातून बेकायदेशीरपणे गोवंश सदृश्य जनावराचे मांस घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे. या वाहनातून २९० किलो मांस विनापरवाना जप्त करण्यात आले असून, वाहनासह दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी पहाटे १२ ते ४ या वेळेत माजगाव येथील गोठणेश्वर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यावेळी (GA 03R-7793) क्रमांकाच्या महिंद्रा झायलो वाहनाची तपासणी करण्यात आली.

या तपासणीत, वाहनातून बेकायदेशीरपणे गोवंश सदृश्य जनावराचे २९० किलो मांस कर्नाटकहून गोवा येथे वाहतूक केले जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करून त्यातील दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गौस मुजावर (वय ३७, रा. म्हापसा, गोवा) आणि रबानी भंडारी (वय ३०, रा. हनगल, कर्नाटक) अशी आहेत. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५, ९ आणि मोटर वाहन कायदा कलम १९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहने तपासली जात आहेत. अशा प्रकारची कोणतीही अवैध मांस किंवा प्राणी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!