🛑सिंधुदुर्गात मटका दिसायला बंद…पण खरोखर बंद कधी होणार?
*🛑सिंधुदुर्गात मटका दिसायला बंद…पण खरोखर बंद कधी होणार?*
*🛑मटका टपरी पुढून बंद तर मागून सुरू.आता बुकींग साठी रीक्षा,चार चाकीचा आधार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २२:-* सिंधुदुर्गात मटका जुगार “दिसायला बंद” आहे. टपरी पुढून बंद – पण मागच्या बाजूने सुरु. काही ठिकाणी बुकी थेट रिक्शात, तर काही चारचाकीत बसून कल्याण-मुंबईचे आकडे घेतायत. दिसायला कायदेशीर, पण प्रत्यक्षात अवैध धंदा मात्र जोरात.
हे चित्र नवीन नाही. गृहमंत्री कै. गोपीनाथ मुंडे यांनी एकेकाळी मटका बंद करण्याची गाजलेली घोषणा केली होती. पण त्यांनाही ते पूर्णत्वाला नेता आले नाही. कारण मटक्याची मुळे एवढी खोलवर रुजली आहेत की, प्रत्येक पायरीवर त्याला पोसणारे, लपवणारे आणि संरक्षण देणारे सापडतात.
*बुकींचा आत्मविश्वास – आका कोण?*
“मटका, जुगार, दारू कधीच बंद होणार नाहीत. हे चार दिवसांचे खेळ आहेत…” असे बिनधास्तपणे सांगणारा सिंधुदुर्गातील मटका बुकी. एवढी हिम्मत त्याला कुठून येते? पोलिसांना आव्हान द्यायची ताकद कोण देतो? प्रश्न सरळ आहे – “आका” कुठे आहे? टपरीवाल्यांना पकडून काय होणार, त्यांचा आका गजाआड न गेल्याशिवाय सिंधुदुर्ग या विळख्यातून बाहेर पडणारच नाही.
*पालकमंत्र्यांचा दणका – पण पुढे काय?*
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच केलेली धाडसी कारवाई पाहिली. त्यांनी थेट मटका बुकींवर धडाका घातला आणि संदेश दिला – “माझ्या जिल्ह्यात चुकीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत.”
हे स्वागतार्ह आहे. पण प्रश्न आहे – प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री धाड टाकायला जाणार का? पोलिस यंत्रणा एवढी निष्प्रभ का झाली आहे की मंत्री येईपर्यंत वाट पाहावी लागते?
*पोलिसांची जबाबदारी*
सिंधुदुर्ग पोलिसांनी आता तरी डोळे उघडावेत. मटका, गांजा, चरस, अफू, विषारी दारू… हे सर्व समाजाला पोखरत आहे. युवकांची पिढी नष्ट होत आहे. पालकमंत्री एकदा दणका देऊन गेलेत – आता पोलीसांनी पुढे तीच पद्धत वापरून आका गजाआड करावा. फक्त लहानसहान टपरीवाल्यांवर धाडी घालून खोटा पाडाव केला तर तेवढे पुरेसे ठरणार नाही.
*समुळ उच्चाटन – नाहीतर*…
गावोगावी, गल्लीबोळात, टपरीच्या मागे सुरू असलेला मटका आणि त्याच्यासोबत आलेले अमली पदार्थांचे जाळे हे सिंधुदुर्गासाठी कलंक आहे. या विळख्यातून बाहेर पडायचे असेल, तर समुळ उच्चाटन हाच एकमेव मार्ग आहे.नाहीतर, अजून काही वर्षांत हा जिल्हा “पर्यटन जिल्हा” म्हणून नव्हे तर “मटका, दारू आणि ड्रग्जचे अड्डे” म्हणून बदनाम होईल.
*निष्कर्ष*
सिंधुदुर्गात मटका दिसायला बंद असला तरी तो प्रत्यक्षात बंद नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे –
पोलिसांनी धाडसी कारवाई केली नाही, आका उघडकीस आणला नाही,आणि समाजाने आवाज उठवला नाही,तर हा जिल्हा हळूहळू गुन्हेगारीच्या गर्तेत खेचला जाईल.पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला इशारा हा शेवटचा इशारा समजून पोलीस प्रशासनाने आणि समाजाने जागे व्हायला हवे. अजूनही वेळ गेलेली नाही – पण ती फार उरलेलीही नाही.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

