कुडाळ पोलिसांना बाळा राणेचा थेट सवाल : “माझा मुडदा पाडला तरी चालेल, पण नियमाचे उल्लंघन करणारा भोंगा जप्त झाला पाहिजे*!”
*कुडाळ पोलिसांना बाळा राणेचा थेट सवाल : “माझा मुडदा पाडला तरी चालेल, पण नियमाचे उल्लंघन करणारा भोंगा जप्त झाला पाहिजे*!”
कुडाळ, दि २१ :
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा प्रशासनाच्या ढिलाईवर बोट ठेवणारा संतापजनक अर्ज समोर आला आहे. पानबाजार कुडाळ येथील बाबाजी उर्फ बाळा सुभाष राणे या सजग नागरिकाने तब्बल १८ वर्षांच्या सहनशीलतेनंतर पोलिसांना थेट आव्हान देत FIRची मागणी केली आहे.
“माझा मुडदा पाडला तरी चालेल, पण त्या मस्जिदवरील भोंगे जप्त झालेच पाहिजेत, अन्यथा माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा…!” अशा थरकाप उडवणाऱ्या शब्दांनी केलेल्या या अर्जामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
१८ वर्षे – १४ पोलीस निरीक्षक – शून्य परिणाम!राणे यांनी २००७ पासून ते २०२५ पर्यंत तब्बल १८ वर्षे हा ध्वनीप्रदूषणाचा छळ सहन केला. या काळात कुडाळ पोलीस ठाण्याला १४ निरीक्षक बदलले, अनेकांनी ‘भोंगे हटाव – ध्वनीप्रदूषण बचाव’ मोहिम हाती घेतली, पण स्थानिक राजकीय दबावामुळे कोणताही ठोस निकाल लागला नाही.
“काही अधिकारी सजग नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले. पण राजकीय दबाव, धार्मिक टोळ्यांची धमकी आणि प्रशासनाचे मौन यामुळे त्यांचाही हिरमोड झाला. शेवटी आम्ही नागरिक मात्र छळ सहन करत राहिलो,” असा संतापजनक आरोप राणे यांनी केला आहे.
*धक्कादायक खुलासा* – ‘तुम्हाला आवाजाचा त्रास होतो तर दुसरीकडे राहायला जा!’या अर्जात माजी महिला पोलीस अधिकाऱ्यावरील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “भोंग्यांचा आवाज कमी करण्याऐवजी त्यांनी मला उलट विचारले — तुम्हाला त्रास होतो तर दुसऱ्या ठिकाणी का राहत नाही?” असे राणे यांनी नमूद केले आहे.हा खुलासा केवळ ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न राहिलेला नाही, तर “सामान्य नागरिकाने आपल्या गावात राहण्याचा हक्क टिकवायचा की भोंग्यांच्या दहशतीला झुकायचं?” हा ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे.
*राणेंची ठाम मागणी*
कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी भोंगा चालक व मालकांवर तातडीने FIR दाखल करावा.अन्यथा, “बाळा राणे, तुम्हीच पानबाजार सोडा” असे पोलिस निरीक्षकांनी सही-शिक्क्यानिशी पत्र द्यावे.अन्यथा माझ्यावरच गुन्हा दाखल करा, पण ही अन्याय्य परिस्थिती थांबवा.
*हिंदू आत्मसन्मानाचा प्रश्न*
या अर्जात राणे यांनी समाजाच्या जखमेवर बोट ठेवले आहे.“बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते — गर्व से कहो हम हिंदू हैं! पण आज परिस्थिती अशी आहे की शरम से बोलो हम हिंदू हैं!” अशा उद्गारांनी त्यांनी हिंदू समाजाच्या आत्मसन्मानाचा प्रश्न उभा केला आहे.
*प्रशासनाची कसोटी*
या अर्जाची प्रत राणे यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, सोशल मीडिया व प्रिंट मीडियाला पाठवली आहे. आता प्रशासनाकडे दोनच पर्याय उरतात — FIR नोंदवून नागरिकांना न्याय द्यावा, किंवा पुन्हा एकदा मौन बाळगून राजकीय दबावाखाली नतमस्तक व्हावे.
*संपादकीय सवाल*
एका सामान्य नागरिकाला तब्बल १८ वर्षे न्यायासाठी भटकंती करावी लागते, पोलिसांच्या गोड विनंत्या ऐकाव्या लागतात, आणि शेवटी थेट “माझा मुडदा पाडला तरी चालेल” असं म्हणत अर्ज करावा लागतो… हे प्रशासनाच्या अपयशाचं ज्वलंत उदाहरण नाही काय? कायदा आणि न्याय हिंदू नागरिकांसाठी वेगळा आणि अन्यांसाठी वेगळा का?कोर्टाच्या आदेशांचा अवमान होत असताना पोलिस प्रशासन झोपेत का?नागरिकाने आवाज दाबून स्थलांतर करावे की प्रशासनाने कायदा अंमलात आणावा?या प्रश्नांची उत्तरं देणं आता प्रशासनाच्या मानमरातबाशी जोडलेलं आहे.

