कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

प्रेरणा दिवस उपक्रमांतर्गत उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांची शारदा विद्यालय मळगाव शाळेस भेट

प्रेरणा दिवस उपक्रमांतर्गत उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांची शारदा विद्यालय मळगाव शाळेस भेट

*शाळेच्या भौतिक गरजा आणि शैक्षणिक गुणवत्ता बाबत केली पाहणी*

*सहदेव राऊळ*

सावंतवाडी : प्रेरणा दिवस उपक्रमांतर्गत काल शनिवारी सिंधुदुर्ग उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस भेट देऊन शाळेच्या भौतिक गरजा आणि शैक्षणिक गुणवत्ता याबाबत पाहणी केली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी मळगाव ग्राम महसूल अधिकारी सुप्रिया घोडके, कुंभार्ली ग्राम महसूल अधिकारी सायली मांजरेकर, ग्राम महसूल सेवक रोशनी जाधव, रोजगार सेवक सुंदर सावळ, कुंभार्ली पोलीस पाटील गीत गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, वर्षा गवस आदी उपस्थित होते.
यावेळी पोवार यांनी संपूर्ण शाळेच्या इमारतीसहीत इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्ग खोल्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पहिली ते चौथीच्या मुलांशी संवाद साधला. तसेच अंगणवाडी शाळा व पोषण आहार खोलीचीही त्यांनी पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!