🛑खड्डेमय महामार्गावर जनतेचा जीव धोक्यात:
*🛑खड्डेमय महामार्गावर जनतेचा जीव धोक्यात:*
*🛑सत्ताधाऱ्यांना जनतेचा जाब – “नेमके कधी बुजणार हे खड्डे?”*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याची चाळण होऊन रोज नवे अपघात घडत आहेत. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन सततच्या तक्रारींवर कानाडोळाच करत आहे. यामुळे नागरिक संतप्त होऊन थेट सवाल करत आहेत – “खड्डे बुजवणार कोणाच्या जीवावर? आणि प्रशासन नेमकं जागं होणार कधी?”
सावंतवाडी–कुडाळ मार्गावरील कोलगाव तिठा, आकेरी ग्रामपंचायत परिसर, आकेरी मेट, हॉटेल सागर पंजाब, कोलगाव-लतीफ बेग भाग – या ठिकाणी खड्ड्यांचा अतिरेक झाला आहे. दुचाकीस्वारांना प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. मोठ्या वाहनांच्या फेऱ्यात तर दुचाकीस्वारांची अक्षरशः तारांबळ उडते.
दरम्यान, इलेक्ट्रिक बस कनेक्शनसाठी कोलगाव परिसरात करण्यात आलेली खोदाई व्यवस्थित न भरल्याने संपूर्ण रस्ताच गायब झाल्याचे चित्र आहे. उडवाजोडीने खड्डे बुजवण्याचे प्रकार होत आहेत. पण समोरून कंटेनर, बस, ट्रक आल्यावर वाहनचालकांना चुकवताना मृत्यूला आमंत्रण द्यावे लागत आहे.
सत्ताधारी नेते वारंवार आश्वासन देत होते – “गणपतीपूर्वी रस्ते गुळगुळीत होतील.” पण आता गणेशोत्सव संपून गेला तरी खड्डे मात्र जसेच्या तसेच आहेत. लोकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ बघून नागरिक प्रचंड संतापले आहेत.
*“जनतेला किती बळी द्यावे लागणार?* अपघात होऊन मृत्यू झाल्यावरच खड्डे बुजवणार का?” – असा थेट जाब प्रशासनाला विचारला जात आहे.रस्त्यावरून उग्र आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आता खड्ड्यांना झाकण्यासाठी डांबर नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे!
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

