🛑पंचायत राज अभियानासाठी सर्वतोपरी सहकार्य !
*🛑पंचायत राज अभियानासाठी सर्वतोपरी सहकार्य !*
*🛑वैभववाडी गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांचे प्रतिपादन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि- १७:-* संपुर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले जात असून वैभववाडीत हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अभियानामध्ये सहभागी होऊन आपला तालुका जिल्ह्यात अव्वल ठरेल यासाठी प्रयत्न करावेत. पंचायत राज अभियानासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे वैभववाडी तालुका गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी विस्तार अधिकारी मनोज सावंत, संतोष टक्के, विशाल चौगुले आदी उपस्थित होते. जंगले पुढे म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन जाणे, हा कार्यक्रमाचा गाभा आहे. शाश्वत विकासासाठी नऊ संकल्पना आणि १७ ध्येये निश्चित करण्यात आली असून त्या अंतर्गत १६९ लक्ष उद्दिष्टे जाहीर केली आहेत. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थांचे मोठे योगदान असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, हे मुख्य ध्येय आहे ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे, ग्रामीण नागरिकांना सुलभतेने सेवा पुरवणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायत राज संस्थांचे कामकाज गतिमान करणे, या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे मुख्य सात घटक असून यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोक सहभाग, श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे, जलसमृद्ध व स्वच्छ हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, सक्षम पंचायत उपजीविका विकास व सामाजिक न्याय हे अभियानाचे सात प्रमुख घटक आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

