कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कणकवली रुग्णालयात आज ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान.

*🛑कणकवली रुग्णालयात आज ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १७:-* महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे १७ व २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत हे शिबीर होणार असून याचा शुभारंभ पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

या शिबिरांमध्ये विविध आरोग्यसेवा मोफत पुरवल्या जाणार आहेत. महिलांची असंसर्गजन्य रोग तपासणी (मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग), माता आणि बाल आरोग्य सेवा, गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी,रक्तदान शिबीर,१ऑक्टोबर या राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान अनुषंगाने राष्ट्रीय महास्वेच्छा रक्तदान या अभियानादिवशी राबविण्यात येणार आहे. आयुष्यमान वयवंदना कार्ड नोंदणी आणि कार्ड वाटप करण्यात येणार आहे. क्षयरोग निर्मुलनासाठी ‘निक्षय मित्र’ स्वयंसेवकांची नोंदणी केली जाणार आहे.

या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर-मध्यप्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा १७ सप्टेंबर रोजी राज्यभर होणार असून राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राज्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. राज्यभरात त्याच दिवशी प्रत्येक जिल्हा व महापालिका स्तरावर महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!