आडेली येथे २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴वेंगुर्ले,दि.१३: तालुक्यातील आडेली जांभरमळा येथे २५ वर्षीय विवाहितेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह तिच्या माहेरी राहत्या घरी आढळला आहे. दरम्यान सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी हा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निदान आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संजीवनी पाटील यांनी केले आहे.

दरम्यान याबाबत वृत्त असे की, आडेली जांभरमळा येथील शांताराम धुरी यांच्या घरात त्यांची विवाहित मुलगी जानवी जयवंत पाटकर (वय २५) पूर्वाश्रमीची रेणुका धुरी हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आज आढळुन आला.

जानवी हिचा नेरूर येथील जयवंत पाटकर यांच्याशी १५ जून २०२० रोजी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर या दांपत्या मध्ये काही घरघुती कारणामुळे पटत नसल्याने जानवी ही चार महिन्यापूर्वी आपल्या माहेरी आली होती.

या दरम्यान जानवी हिच्या नवऱ्याने घटस्पोटसाठी कोर्टात खटला दाखल केला आहे. यानंतर जानवी व तिचे वडील हे दोघेच आडेली येथील घरात राहत होते. तीन महिन्यांपूर्वी तिचे वडील शांताराम हे शारीरिक आजारावर उपचार घेण्यासाठी त्यांचा मुलगा सीताराम धुरी यांच्याकडे मुंबईत गेले होते. दरम्यान काल १२ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून घरातून काहीतरी कूजल्यासारखा वास येत असल्याचे कळवले होती. यानंतर तिचे वडील व भाऊ हे मुंबई वरून आज दाखल होताच त्यांना जानवी हीच मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळुन आला. याबाबत वडील शांताराम यांनी वेंगुर्ले पोलिसांना याची खबर दिली. यावेळी सावंतवाडी चे पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंखे व पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्यासाहित पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजीवनी पाटील यांनी मृतदेहाची पोलीस, ग्रामस्थ समवेत केलेल्या पाहणीत तिचा मृत्यू सुमारे १५ ते २० दिवसांच्या अगोदर झाल्याचे प्राथमिक निदान केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गडेकर, प्रवीण गाडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन सावंत करत आहेत.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!