कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑देवगडात गांजाचा बाजार उघडकीस – चार जण गजाआड; कोकण लाईव्हचा इशारा खरा!

*🛑देवगडात गांजाचा बाजार उघडकीस – चार जण गजाआड; कोकण लाईव्हचा इशारा खरा!*

 

*🛑आता तरी माफियांवर कारवाई होणार की त्यांनाच राजकीय छत्रछाया?*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०५:-* देवगड-कुणकेश्वर रस्त्यावर मध्यरात्री ब्राह्मणदेव मंदिराजवळ चार जण गांजाची देवाणघेवाण करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी तब्बल २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की कोकणात गांजामाफियांचे जाळे दिवसेंदिवस पसरत आहे आणि त्यांना स्थानिक राजकीय संरक्षण मिळत असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर धंदा चालणे अशक्य आहे.

*गजाआड झालेले संशयित:*

*मिलिंद महादेव कुबल (५६, आनंदवाडी-देवगड)*

*मनोज वसंत जाधव (५०, देवगड किल्ला-देवगड)*

*सिद्धेश अनिरुद्ध मयेकर (२५, तारकर्ली काळेथर-मालवण)*

*गौरव विनोद पाटकर (२२, वायरी आडवण)*

त्यांच्याकडून ९५ ग्रॅम गांजा, ७० हजार किमतीच्या दोन दुचाकी, रोख रक्कम असा एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. चौकशीत आरोपींनी हा गांजा मालवणातील संपर्कांना देण्यासाठी आणल्याचे मान्य केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. सुधीर सावंत, विल्सन डिसोझा, प्रकाश कदम, आशिष कदम, महेश्वर समजीस्कर यांच्या पथकाने केली आहे.

*मोठा सवाल – प्रशासन झोपेतच का?*

कोकण लाईव्हने गेल्या काही महिन्यांपासून गांजा विक्री आणि त्यामागील माफियांचा पर्दाफाश केला होता. तरीदेखील इतक्या दिवसांनंतरच कारवाई का? पोलिसांकडे माहिती असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जाळे फोफावत राहिले, म्हणजेच कुठेतरी हात वर करून दुर्लक्ष केले गेले हे उघड आहे.

*राजकीय छत्रछाया*

या माफियांचे धाडस एवढे कसे वाढले? यामागे स्पष्टपणे स्थानिक स्तरावरचा राजकीय आश्रय आहे, हे नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे. काहींना अटक करून दाखवले जाते, पण त्यामागचे “मोठे मासे” मात्र मोकाट फिरतात.

*कोकणकरांसाठी धोक्याची घंटा*

आज देवगड, मालवण, कुडाळ, कणकवलीत ही व्यसनविक्री पोहोचली आहे. उद्या हा विषारी धंदा गावोगाव पसरला तर आपल्या मुलांचे भवितव्य धोक्यात येईल. प्रशासनाने आत्ताच कठोर कारवाई न केल्यास कोकणाचा हिरवाईचा पट्टा “गांजा माफियांच्या” ताब्यात जाण्यास वेळ लागणार नाही

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!